Monday, November 29, 2010

डोक्यावरी पहाता प्रतिचंद्र.

डोक्यावरी पहाता प्रतिचंद्र चमकणारे
आले क्षणात पुरते भडकून राग सारे

माझ्याच लोचनांना झालो अनोळखी मी
कळले ना कुंतलांस का प्यारी होई भूमी
फुलतील कसे आता ते, डोक्यावरी पिसारे

मज हवी हवी वाटे संपुर्ण केशशोभा
माझा नि शांपू-तेलांचा आहे जुना घरोबा
केस एक एक गळता, अंगावरी शहारे

नसता मनात माझ्या का डोके हलके वाटे
केसांतूनी फिरणार्‍या कंगव्याची याद येते
झाले कपाळ मोठे, टाळूवरी निखारे..

* * *

मुळ गीत इथे पहा.

No comments:

Post a Comment