Friday, August 12, 2011

पहाटे पहाटे मला झोप आली.

पहाटे पहाटे मला झोप आली
कशी ढेकणांची दिशाभूल झाली?

मलाही कळेना, तूलाही कळेना
कसे चिरडावे मुठी ढेकणांना
भिंतीस आली पुरेशी न लाली

चल झोपूया, रहा जागे कशाला?
सुरू जाहल्या हालचाली उशाला
अशी का घडावी पुन्हा रात्रपाळी

कसा वाचवू रक्त माझ्या शरीरा
रिता सर्व झाला कळाले उशिरा
असे चुंबिले तू मला भोवताली

तुला आण शाकाहारी पुर्वजांची
तुला आण बदललेल्या कुसांची
तुझ्या जिंकण्याची मला कीव आली


मुळ गीत इथे पहा.

* * *

1 comment:

  1. मस्त विडंबन, अमित! आवडले.

    ReplyDelete