Tuesday, August 16, 2011

तरूण आहे मात्र अजुनी..!

तरूण आहे मात्र अजूनी, राजसा विटलास का रे?
एवढ्यातच त्या घुशीवर तू असा भाळलास का रे?

अजूनही जाहले ना नयनी मोतीबिंदूही विशाला
अजून मी पडले कुठे रे? हाय! तू चिडलास का रे?

सांग, ह्या शेजारणीच्या कारट्याला काय सांगू?
सटकले लाटणे माझे.. आणि तू सुजलास का रे?

बघ मला पुसतोच आहे संशयी समाज सारा
कामवालीच्या शीलाचा भंग तू केलास का रे?

उसळती पोटात तुझीया हरभर्‍याच्या मंद लाटा
तू पचवाया अताशा भोजने शिकलास का रे?

कपाळ फुटलेले का रे? डोळे ही लालबुंद का रे?
बोल, पिऊनी त्या गटारी तू असा पडलास का रे?


मुळ गीत इथे पहा.

* * *

1 comment: