Tuesday, October 11, 2011

बायको घरात जंग छेडते खरी.

(चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी )

बायको घरात जंग छेडते खरी
सैनिका जरा जपून जा तुझ्या घरी !

ऑफीसातूनी येता चहा टाकते
घोट घेता त्याचा, विष बरे वाटते
बद्धकोष्ट नाही तरी, उगाच छळते
कॅन्टीनातला चहा बेश्ट त्यापरी !

सुप बनवून असा डाव साधला
पाटणकरांचा काढा नसे वेगळा
वाईट करून तोंड, गप्प ढोसला
सोसतो हिला, प्राण आहे तोवरी !

काल शेजारिणीला काय पाहीले !
खिडकीस आज नवे पडदे लागले
लाटण्याने बिनचुक कपाळ भेदले
सुजले कपाळ, लेप लाव त्यावरी !

* * *

No comments:

Post a Comment