Thursday, June 12, 2014

मळलेले गाउन माझे..!

मळलेले गाउन माझे साबणाने तू धुवावे
मोकळ्या गच्चीत नेऊनी तयाला वाळवावे

जाऊनी पुढल्या सुट्टीत खरेदी इतकी करू की,
राजसा, घेऊनी पिशव्या माझिया मागे फिरावे

लाडक्या मालिका माझ्या, पाहू दे मजला सुखाने
यायला घरी तुजला ऑफीसातूनी लेट व्हावे

रे ! तुला भल्या पहाटे गजराने जाग यावी
तू मला चहा करावा अन् पाणी तापवावे

* * *

2 comments:

  1. Barech diwas zale katha nahi aali rav tumachi taka ki ekhadi.

    ReplyDelete
  2. सध्या वेळ मिळत नाही लिहायला. पण मागील काही कथा वाचल्या नसल्यास ओल्डर पोस्ट पहा. लवकरच नवीन कथा टाकण्याचा विचार आहे.
    धन्यवाद. अजूनही या ब्लॉगला लोकं भेट देत असतील याची मला अजिबातच खात्री नव्हती.

    ReplyDelete