Monday, January 12, 2015

सखे आता हे फार जाहले

आज चालणे उन्हात पडले, तुझ्यामुळे
डोळ्यांपुढे अंधार दाटले, तुझ्यामुळे !

घाम शर्टही भिजवत होते
तुझे इरादे बुलंद होते
मँगोला तीन-चार जाहले, तुझ्यामुळे !

"दत्तमंदीर" जनांस पुसले
प्रत्येकाचे तर्क निराळे
आत्याचे तुझ्या घर लांबले, तुझ्यामुळे !

कडेत माझ्या होती वीणा
बंडू उधळे दाही दिशांना
विंचवाचे बिर्‍हाड लाजले, तुझ्यामुळे !

घर दिसले नि आली स्फुर्ती
कुलूप होते, आत्या नव्हती
सखे आता हे फार जाहले, तुझ्यामुळे !

* * *

No comments:

Post a Comment