Friday, August 12, 2016

|| आरती श्रीहनीसिंगची ||

|| आरती श्रीहनीसिंगची ||


जय देव जय देव जय हनीसिंग, हो यो यो हनीसिंग |
तुमच्या गाण्याची चढलीया झिंग, जय देव जय देव || धृ. ||

गळा दाव्याइतुकी जाड चेन |
मस्तकी टोपी शोभे इच्चीबेणं |
केसांची लावूनी वाट तू छान |
गल्लोगल्ली रूढ केली फॅशन || जय देव जय देव || १ ||

तुमचिया मुखे रॅप जन्मला |
बॉलीवुडी मोठा आनंद झाला |
वस्त्रे त्यागूनी थिरकती बाला |
तयांमध्ये शोभे हनी सावळा || जय देव जय देव || २ ||

ग्रॅमी आणण्याची भाषा तू केली |
मग कशी, कुठे माशी शिंकली ?
आम्हां पामरांची कर्णे निमाली |
ऐकूनी तुमचिया भजनांत गाली || जय देव जय देव || ३ ||

आज ब्लु है पानी पानी पानी पानी |
और म्हणे दिन है सनी सनी सनी |
एकाहूनी एक मंजूळगाणी |
यो यो भक्त गाती बा उपासनी || जय देव जय देव || ४ ||

जय देव जय देव जय हनीसिंग, हो यो यो हनीसिंग |
तुमच्या गाण्याची चढलीया झिंग, जय देव जय देव || धृ. ||


* * *

1 comment:

  1. अत्यंत समर्पक आरती आहे. या इसमाला एकच म्हणावेसे वाटते "तुका म्हणे ऐशा नरा, मोजून हाणाव्या पैजारा"

    ReplyDelete