मणक्यांची माळ दुखे अजुनि कंबरेत
शेक घेऊनी वरती बाम लावलेत
कोळूनी तू पी युट्युब, थंबनेल त्यांचे
डोळ्यांदेखत पळे दुखणे पामराचे
मणक्यांस फरक पडतो शून्य मिनिटांत
त्यासाठी तापवुनी नारळाचं तेल
मोहरीलाच तडकावूनी, पाठीवरी चोळ
रिमझिमते औषध हे जलद चादरीत
हातांसह बोटांनी पाठ चेपताना
बरगड्यांची मुक्त हाडे मिळुनि मोजताना
आवंढ्यापरी येतसे फुफ्फुस सरकुनी गळ्यात
तू गेलिस चोळुनी ते मूव (Moov) रागे रागे
घरघरणे पंख्याचे फक्त उरे मागे
होते ही चिडचिड का कधी तुझ्या घरात?
* * *
मूळ गीत : https://www.aathavanitli-gani.com/Song/Bagalyanchi_Maal_Phule