समस्त अनुकुल ग्रह माझ्या कुंडलीत येऊन 'रमी' खेळत जरी बसले तरी माझे
फोटो चांगले येणं अशक्य ! माझा चेहरा अमोल पालेकर छापाचा असताना फोटोत तोच
चेहरा रझा मुराद छापाचा कसा होतो? हे मला आजवर न उकललेलं कोडं आहे.
परवाच कुठल्याशा फॉर्मवर चिकटवण्यासाठी पासपोर्ट साईज फोटोची गरज पडली,
म्हणून मी 'पांढरकामे फोटो स्टुडिओ'त दाखल झालो. मी सहज स्टुडिओत डोकावून
पाहीले. पांढरकामे एका जोडप्याचे फोटो काढत होते. स्टुडिओत लाकडाची एक
मोठ्ठी चंद्रकोर होती, त्या चंद्रकोरीवर ते जोडपे रती-मदनाची पोज घेऊन बसले
होते. नील आर्मस्ट्राँगनंतर चंद्रावर पाऊल ठेवणारे हे बहुधा दुसरे !
त्या मदनाची रती वजनाने इतकी अवाढव्य होती, की ती जर निंबोणीच्या झाडामागे
लपणार्या खर्याखुर्या चंद्रावर बसली असती तर तो चंद्र धुमकेतूसारखा येऊन
पृथ्वीवर आदळला असता, यात 'रती'भरदेखील शंका नाही.
आतील फोटोसेशन आटपेपर्यंत बाहेरील टेबलावरील जाड काचेतून दिसणारे फोटो पाहत असताना एका फोटोने मला बुचकळ्यात टाकले.
दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवून आणि एका हातात गुलाबाचं फुल घेवून पांढरकामे फुल्ल बॉलीवूड स्टाईलने कतरीना कैफला प्रपोज करत होता !
हे पाहून ट्राफीक हवालदाराने आपल्या शिट्टीत हवा भरल्यावर त्या शिट्टीतील
तो खडा जसा आतल्या आत 'भांगडा' करू लागतो, तसा माझा मेंदू कवटीतल्या कवटीत
'भांगडा' करू लागला.
फिल्मफेअर वा तत्सम मासिकांतून छापून आलेला कतरीनाचा फोटो एकांतात दोनेक
सेकंद छातीशी धरतानाही 'आपल्याला कुणी पाहत तर नाही ना?' असं म्हणत मी
आजुबाजुला पाहून खात्री करून घेतो, तिथं हा पांढरकाम्या भलताच 'दबंग'
निघाला.
इतक्यात आतून धाड्कन आवाज आला आणि मी नुकत्याच कल्पिलेल्या प्रसंगाची मला उप'रती' झाली.
चांद्रमोहीम अयशस्वी ठरल्यानंतर पांढरकामे तणतणत बाहेर आले. आता त्यांना
दुसरी चंद्रकोर ऑर्डर करावी लागणार होती. पती-पत्नींसोबत नवी चंद्रकोर
विकत आणण्यासाठी लागणार्या पैशांबाबत झालेल्या किरकोळ धुसफुसीनंतर ते
नव्या गिर्हाईकाकडे अर्थात माझ्याकडे वळले.
"पांढरकामे, सलमानच्या आधी आपणच बाजी मारलीत !" माझ्या मनाला अपार यातना देणार्या त्या फोटोवर बोट ठेवत मी म्हणालो.
"सगळी फोटोशॉपची किमया !" पांढरकामेंनी फोटोतली 'गोम' सांगितली.
मागे कधीतरी एका सलूनच्या दुकानाबाहेर असलेल्या फलकावर त्याच दुकानातला
न्हावी चक्क अजय देवगणचे केस कापतोय, असा फोटो पाहील्याचं मला एकदम आठवलं.
"शंभर रूपयांत तुम्ही कतरीनासोबत बॅटमिंटन खेळू शकता आणि दोनशे रूपयांत
तुम्ही तिच्या गालाचा मुका घेऊ शकता." पांढरकामेंना कसला 'कैफ' चढला होता?
देव जाणे !
एखाद्या अट्टल मद्यप्याच्या एका बाजूस रम आणि दुसर्या बाजूस विस्की ठेवल्यावर तो जसा विचारात पडेल, तसाच मी गहन विचारात बुडालो.
"बोला बॅडमिंटन की मुका?" पांढरकामेंनी माझ्या विचारांत खंड पाडला.
"पासपोर्ट साईज फोटो." असं म्हणून मी 'मुका'ट्याने आत शिरलो आणि फोटो काढून घेण्यासाठी मांडलेल्या टेबलावर अंग चोरून बसलो.
सहज म्हणून स्टुडिओत नजर फिरवली तेव्हा मला तिथे लाकडी घोडा, लाकडी कार,
लाकडी मोटरसायकल, लाकडी होडी (अहो, होडी लाकडाचीच असते म्हटलं ! कायतरीच
आपलं..!) आणि तुळसदेखील चक्क लाकडी दिसली.
इलेक्ट्रीक बोर्डावरील दोन बटने दाबून पांढरकामेंनी स्टुडिओत छत्रीसारखे
दिसणारे काहीतरी होते, त्यातील दिवे पेटवले आणि मी एकदम 'प्रकाशझोतात' आलो.
फोटो काढून घेताना माझा चेहरा इतका गंभीर असतो की, इथं जणु अणुकरार अथवा ग्लोबल वॉर्मिंग याविषयी चर्चा चाललेली असावी.
पांढरकामेंनी माझी हनुवटी पकडून माझी मान कधी खाली कधी वर कधी किंचीत
उजवीकडे कधी डावीकडे अशी चहुदिशेस फिरवून अखेर 'स्थिर' केली आणि आपला एक
डोळा मिटून दुसरा डोळा क्यामेर्याच्या दुर्बिणीला लावला.
"स्माईल !" असं म्हणून पांढरकामेंनी आकाशात वीज चमकते, तसा क्यामेर्यातून एक लख्ख प्रकाश चमकवला.
फोटो 'धुवून' आल्यावर जेव्हा मी ते पाहीले तेव्हा माझा हिरमोड की काय
म्हणतात? तो झाला. एखाद्या फ्लॅटच्या दरवाज्याबाहेर मी उभा असताना आतून
कुणी दाराला असलेल्या भोकातील दुर्बिणीतून मला पाहील्यास मी तसा दिसेन असेन
कदाचित !
माझे 'परेड सावsssssssssध्धान' अवस्थेतले फोटो पाहून माझ्या
एका मित्राची प्रतिक्रिया मोठी गमतीदार होती. तो म्हणाला होता, "तूझे फोटो
निघत असताना आसपास 'जन-गण-मन' चालू होते काय?"
इतरांचे सुंदर आणि प्रसन्न फोटो पाहीले की मला उगीचच गलबलल्यासारखे
होते. अगदी प्रवासाहून आलेल्या मित्रांच्या फोटोतील करामती पाहील्या मला
त्यांचं मोठं कौतूक वाटतं.
कुणी आयफेल टॉवरच चिमटीत पकडलाय, तर कुणी कुतुबमिनारलाच ढकलतोय. एका
महाभागाने तर 'तो सुर्य गिळतोय' असा फोटो काढून घेतला होता. तो फोटो पाहून
मी पवनपुत्र मारूतीच्या त्या आधुनिक आवृत्तीला मनोमन अभिवादन केले.
आजतागायत काढलेल्या माझ्या निम्म्याहून अधिक फोटोंत आपणांस माझे डोळे भगवान बुद्धांप्रमाणे 'मिटलेलेच' आढळतील.
काहीजणांना फोटो काढून घेण्यात कोण मौज वाटते, तो एक फोटोग्राफरच जाणे? फोटो काढून घेण्याचा त्यांचा उत्साह अवर्णनीय असतो.
माझी आत्या गावातल्या बहुतेक सगळ्या लग्नात हजर असते आणि त्या प्रत्येक
लग्नाच्या अल्बममधील जवळजवळ बहुतेक फोटोंत कुठल्या ना कुठल्या कोपर्यात ती
हटकून दिसतेच दिसते. लग्नातील फोटोत तर आपला निदान हात अथवा साडीचा किमान
पदर तरी यावा, यासाठी अशी मंडळी विलक्षण धडपडत असतात. त्यासाठी मग मुद्दामच
क्यामेर्यासमोरून इकडून तिकडे फेर्या मारताना मी अनेकवेळा पाहीलयं.
माझ्या लग्नातील फोटोसेशन हे एक निराळं प्रकरण आहे.
फोटोग्राफरने मला आणि यज्ञकुंडाभोवती माझ्यासोबतीने सात चकरा मारून
नुकत्याच झालेल्या माझ्या पत्नीला निरनिराळ्या पोज घ्यायला लावून अक्षरशः
काव आणला होता.
कधी एकच कोका-कोलाच्या बाटलीत दोन स्ट्रॉ टाकून आम्हां दोघांना एकाच वेळी
प्यायला सांगत होता (त्यावेळी आमच्या सौ.नी स्ट्रॉद्वारे पाणीउपसा
यंत्रासारखा घटाघट कोला प्राशन केलेला मला आठवतो. मी मात्र 'कोल्ह्याला
द्राक्ष आंबट' ही म्हण सोईनुसार 'कोल्याची ढेकर वाईट' अशी करून मुकाट
मॅन्गोला मांगवला आयमीन मागवला.) कधी माझ्या गळ्यात सौ.ला आपले चांदण्याचे
हात टाकायला सांगत होता, कधी सौ.ला आपले डोके माझ्या खांद्यावर ठेवायला
सांगत होता, तर कधी..... एक ना दोन.
वर आणखी आमच्या उत्साही सौ.च्या हौसेखातर मी सौ.ला 'होम मिनिस्टर'सारखं
उचलून घेतलेला फोटो काढून घेण्यात आला. (त्यावेळी नेमका क्यामेर्यातील रोल
संपला होता आणि फोटोग्राफर क्यामेर्यात नवा रोल टाकेपर्यंत एरवी हापीसात
निव्वळ पेन हे अवजार उचलणार्या मला इथे मात्र कुदळ हे अवजार उचलायला
लागल्यामुळे माझे हात प्रचंड 'पेन' होत होते. पुढे पुढे हेच कुदळ आमच्या
चाळीत 'भांडकुदळ' म्हणून प्रसिद्ध पावले, हा भाग निराळा.. ! )
या विलक्षण त्रासदायक प्रकाराला लोकं फोटोसेशन का म्हणतात? ते मला आजही
कळलेलं नाहीए. माझ्या लेखी या प्रकारास 'फोटोशोषण' याखेरीज दुसरं योग्य नाव
असुच शकत नाही.
लग्नानंतर काही दिवसांनी घरी सुटकेसच्या आकाराचा आणि प्रचंड वजनाचा
अल्बम येऊन पडला. या अल्बमला स्थलांतरीत करण्यासाठी कुठे चाकं आहेत का? ते
आधी मी पाहू लागलो. अल्बमला चाकं नव्हती. म्हणजे आता प्रत्येकाला अल्बममधील
फोटो अल्बमची स्थापना झालेल्या ठिकाणी येऊन पाहणे, सक्तीचं झालं. हे
हल्लीचे अल्बम ग्रंथांसारखे महाकाय का असतात? हे कळायला मार्ग नाही.
मी आणि सौ.नी त्या अल्बमची दोन-तीन वेळा पाहणी केली. तेव्हा आमच्या असं
लक्षात आलं, त्या अल्बममधील प्रत्येक फोटोत एक सुंदर तरूणी दर्शन देत होती.
प्रत्येक फोटोत आपली शुभ्र दंतपंक्ती दाखवणारी ही तरूणी कोण? अशी विचारणा
आम्हां उभयतांत झाली. पण ना ती वधुपक्षातील होती ना वरपक्षातील...अखेर तिला
'अपक्ष' ठरवून आम्ही उभयतांनी एकमेकांच्या 'तोंडी' न लागण्याचा निर्णय
घेतला.
आमच्या लग्नात त्या फोटोग्राफरचं आणि त्या तरूणीचं सुत जुळलं आणि लवकरच त्यांचं 'शुभमंगल' झालं, ही माहीती गोपाळने त्यादिवशी पुरवली.
"त्या फोटोग्राफरच्या लग्नातले फोटो कुणी काढले असतील रे गोपाळ?" मी
असला आचरट प्रश्न विचारताच गोपाळ त्याच्या वहीनीने त्याच्यासाठी टाकलेला
चहा तसाच टाकून पळाला.
"अहो हा फोटो काही धड आलेला नाही." माझं मुंडकं नसलेला फोटो दाखवत सौ. म्हणाली.
"असं कसं म्हणतेस धड आलेला नाही ! मला तर या फोटोत केवळ माझं 'धड'च दिसतयं." माझा हा 'धड'धाकट विनोद सौ.ना कळला नाही.
माझं मुंडकं उडाल्याच्या दु:खाच्या तुलनेत सौ.ना हा विनोद कळला नाही याचं दु:ख अधिक होतं.
फोटोग्राफरांमध्येदेखील 'खाटीक' ही जमात अस्तित्वात असावी, हा नवा शोध मी तेव्हा लावून टाकला.
हल्ली कुणी माझा फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसला की, मी आपल्या चेहर्यावर लागलीच मनोज कुमारांसारखा हात ठेवून देतो.
आताशा मी माझं प्रतिबिंब केवळ आरशात पाहायचं ठरवलयं, कारण आरसा खोटं बोलत नाही म्हणतात !
* * *
Showing posts with label नसती उठाठेव. Show all posts

Thursday, January 24, 2013
Wednesday, December 26, 2012
कंठलंगोट
आमच्या डिपार्टमेंटचे हेड बदलले आणि माझे हेडेक सुरू झाले. त्याला कारणही तसंच होतं.
आमच्या नव्या साहेबाने आम्हांला टाय कम्पल्सरी केला होता आणि टाय नसलेल्या व्यक्तीस रि'टाय'र्ड करण्याची छूपी धमकीही दिली होती.
आता आली ना पंचाईत ! उभ्या जन्मात मला कधी बुटांची नाडी बांधता आली नाही तिथं टायची काय कथा !
पण नव्या नियमांचं पालन करून टाय खरेदी करणे क्रमप्राप्त होतं.
एका दुकानातल्या काचेच्या आत फायबरच्या की प्लास्टीकच्या मानवी आकृतीच्या अंगावर सुट-बुट विथ टाय मी बाहेरूनच पाहून इथे टाय नक्की मिळेल, अशी खात्री करून दुकानात प्रवेश केला.
दुकानात अजिबात गर्दी नव्हती. दुकानातील कामगार जणु माझीच प्रतिक्षा करत होते की काय? अशी शंका मला त्यांनी एकदम गराडा घातल्यावर आली.
"बोला काय देऊ?"
"टायची जोडी मिळेल का?" मी आवंढा गिळत विचारले.
"तुम्ही काय मोजे घ्यायला आलात काय जोडीने घ्यायला?"
"की अंडरवेअर?" त्यांच्यातल्या एकाने दुसर्याच्या कानात ही अंदर की बात कुजबुजलेली मी चोरून ऐकली.
पायातले जोडे काढून त्या तरूणाच्या डोईवर हाणण्याचा कार्यक्रम माझ्या मनात लवकरच बारगळला.
"उद्या तुम्ही टाय किलोवर किंवा डझनावर मागाल?" त्यांच्यातल्या एका आगाऊ तरूणाच्या या विनोदावर इतर मंडळी आपापली तोंडे लपवून फिस्सकन हसली.
'दुकानाचा मालक दुकानात नसावा' हे मी माझ्या अंतर्ज्ञानाने ताडले.
"बरं मग टाय कसा मिळतो इथे?"
माझ्यावर झालेले असंख्य विनोद मी बायकोने रांधलेल्या हरभर्याच्या सहजतेने पचवलेले आहेत.
"टाय शर्टच्या स्वभावानुसार खरेदी करायचा असतो." त्यांच्यातल्या एका पढतमुर्खाने माझ्यासमोर आपले तत्वज्ञान पाजळले.
"शर्टचा स्वभाव? तो आणि कसा ओळखायचा बुवा?" मी सचेतन-अचेतन या विषयावर चाललेल्या व्याख्यानात जिज्ञासुची भुमिका घेतली.
"अहो म्हणजे प्लेन शर्ट, चेक्सवाले शर्ट इ. इ." त्यांच्यातला दुसरा.
"हे पहा, माझ्या कुठल्याही शर्टच्या स्वभावावर औषध नाही." असं विसंगत विधान करून मी आपल्या पसंतीला मुरड घालून त्याने दाखवायला काढलेल्या पहील्या चार-पाच टाय घेऊन तेथून सटकलो.
पण लवकरच मला कळलं, टायखरेदीपेक्षा टायबांधणी हे प्रकरण भयंकर किचकट आहे.
खरेदी केलेल्या टायांपैकी (विद्वानांनी टायच्या अनेकवचनावर प्रकाश टाकावा, तसेच टाय पुल्लिंग की स्त्रीलिंग? याबाबत माझ्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करावा.) प्रथम कुठला टाय गळ्यात बांधायचा? याची निवड आमच्या चिरंजीवांनी
आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर
चिंकीचा बापुस कवटाचोर
(प्रस्तुत ओळींमध्ये यमकाचा खटाटोप करणार्या रचनाकारास साहीत्याची 'ढाल' देण्याचा माझा विचार आहे.)
असले वाह्यात गीत गात त्यातल्या प्रत्येक शब्दागणिक प्रत्येक टायवर बोट ठेवत गीत संपताच ज्या टायवर बोट येईल, तोच टाय गळ्यात बांधायचा अशा विचित्र पद्धतीने केली.
निवडून आलेल्या टायला मी गळ्यात बांधून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आरशासमोर उभं राहून मी अनेक वेळा टायच्या गाठी बांधल्या आणि सोडल्या. पण टायबांधणीचं व्रत काही केल्या सफल होईना.
हा टाय अस्सा फेकून द्यावा आणि वाटल्यास भगवान शंकरांप्रमाणे गळ्यात आयुष्यभर सर्प मिरवावे, या निश्चयापर्यंत येऊन मी ठेपलो. बाजारात 'टाय कसा बांधावा?' यावर मार्गदर्शन करणारं पुस्तक कसं उपलब्ध नाही? किंवा गेलाबाजार 'माझी टायस्टोरी' या किंवा अशा शिर्षकाचं एखाद्या पीडीत लेखकाने आत्मचरित्रही कसं लिहलं नाही? याचे राहून राहून आश्चर्य वाटले.
कधी टायचं एखादं टोक लांबच येत होतं, तर कधी टायच्या गाठीशी गाठच पडत नव्हती यामुळे मी अक्षरशः कंटाळून गेलो होतो.
कंटाळा आल्यावर इंग्रजीत 'टाय'र्ड म्हणूनच म्हणत असावेत कदाचित !
"अहो तो टाय आहे. टॉय नाही. खेळत बसलाय ते त्याच्यासोबत !" इतका वेळ माझ्या टाय बांधण्याच्या धडपडीकडे पाहत मटर सोलता सोलता सौ. म्हणाली.
ही इतकी बोलून दाखवते तर हिलाच टाय बांधायला का सांगू नये? असा विचार क्षणभर माझ्या व्यथित झालेल्या मनात आला. पण दिवाळीत लाडू बांधणे आणि वर्षाकाठी भावाच्या मनगटावर राखी बांधणे याउप्पर सौ.ला बांधाबांधीचा विषेश अनुभव नसावा.
'टाय अनादर डे' बांधावा का? असा विचार माझ्या मनात जवळजवळ 007 वेळा येऊन गेला.
अखेर मी चिरंजीवांस शेजारच्या श्रीयुत वागळेंना बोलावून आणण्यास पिटाळले. श्री. वागळे हे व्यवसायाने बिल्डर आहेत. काही क्षणांत श्री. वागळे आपल्या पत्नीसह अवतरले.
त्यांनी माझ्याच टायने माझाच गळा आवळण्याचा बरेचदा प्रयत्न केला. त्यांनाही टाय बांधणे जमले नाही. शेवटी त्यांनी टाय बांधण्याचा नाद आणि माझा टाय दोन्ही सोडून दिला.
"अहो तुम्ही इतक्या उंच उंच इमारती बांधता. मग तुम्हांला साधा टाय बांधता येऊ नये?" वास्तविक मी हे थट्टेने म्हटले होते, पण वागळेंनी ते मनावर घ्यायचे ठरवले आणि तेव्हाच त्यांनी भांडणाचा श्रीगणेशा केला.
मला कुणी वाईट-साईट बोलत असताना गप्प बसतील तर त्या आमच्या सौ. कसल्या !
सौ. नी भांडणात उत्साहाने भाग घेतला. आता आमच्या इकडच्या सौ. सोनारकी झाल्यावर तिकडच्याही सौ.नी लोहारकी बनण्याचा पवित्रा घेतला आणि खर्या अर्थाने भांडणाला 'तोंड फुटलं'. भांडण सामुहिक झाले.
काही मिनिटांच्या शिव्या-शिवीनंतर अखेर सामना 'टाय' झाला. सौ. वागळे यापुढे आमच्या सौ.ना डोसा बनवायला पॅन देणार नाहीत, या भीष्मप्रतिज्ञेने भांडणाची सांगता झाली. अर्थातच माझ्या आगामी पगारात 'पॅन'चा खर्च वाढला.
'वागळे माझ्यासोबत असे का वागले?' असा प्रश्न संबंध चाळीला पडला.
वास्तविक आता इतक्या घमासानानंतर मी टाय बांधण्याचा विचार जवळजवळ रहितच केला होता. पण मी टाय बांधून वागळेंच्या दारापुढून ताठ मानेने जोवर जात नाही, तोवर सौ स्वस्थ बसणार नाहीत, असं त्या वारंवार पुटपुटत होत्या. सौ. इरेल्या की काय म्हणतात? तशा पेटल्या होत्या.
आता मात्र टाय हा चक्क प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता.
घराला घरपण देणारी माणसं दुरावल्यानंतर जीवाला जीव देणार्या माणसांची आता गरज भासू लागली. अनेक हौशी नाटकांत कधी डॉक्टर, कधी वकील अशा आणि तत्सम टायवाल्या पात्रांच्या भुमिका लिलया साकारणार्या नाट्यभैरव वसंत नटे याची योगायोगाने मला आठवण झाली.
वश्याने चाळीतल्या चार टाळक्यांसह प्रवेश केला. इतक्यात सौ.ने चहा टाकण्यासाठी स्वयंपाकघरात पळ काढला. वास्तविक हा वश्या नाटकात अगदीत सुमार अभिनय करतो. त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर, "पदरचे संवाद बोलून वेळ मारून नेतो की नाही बघच !"
पण वेशभुषा करताना तो टाय मात्र अगदी 'मापात' बांधताना मी प्रत्यक्ष पाहीलयं.
मी त्याला घरी बोलावण्याचं प्रयोजन सांगताच तो नाटकी हसला.
"लेका लग्नात टाय बांधला होतास की नाही?" वश्या.
"तेव्हा आताच्या सारखी सुटाबुटाची भानगड नव्हती तेव्हा सफारी. आणि लग्नात बायकोच्या गळ्यात मंगळसुत्र तेवढं बांधलं होतं. ते बांधलं तिच्या गळ्यात... परंतू फास मात्र माझ्या गळ्याला बसला, हे आता माझ्या लक्षात यायला लागलयं." सौ. स्वयंपाकघरात गेलेली पाहताच माझ्यातली विनोदबुद्धी जागृत झाली.
यावर उपस्थित मंडळी एकमेकांना टाळ्या वगैरे देत दिलखुलास हसली.
चहा आटोपल्यावर वश्याने टाय बांधण्याची मोहीम हाती घेतली. मोठ्या सफाईने वश्या इकडून तिकडे टाय फिरवीत होता.
"वश्या, इतक्या डोकेफोडीपेक्षा ऑफीसला निघताना बो लावत जाऊ का?" मी आपलं उगीचच विचारलं.
"कुणाला बोलावणारेस?"
"अरे बो ! बो ! फुलपाखराच्या आकाराचं असतं ना ते..!"
"लेका तू प्रितम रेस्टारंटमधला वेटर आहेस का बो लावायला?" असं म्हणून त्याने माझ्यावर आपले डोळे 'वेटर'ले आयमीन वटारले. "ऑफीसात टायच चालतो."
"टाय काय संबोधता लेको. कंठलंगोट संबोधा." असंख्य पुस्तके वाचून भाषा कोळून प्यायलेला चाळीतील एकमेव द्वीतीय ज्ञानभास्कर शास्त्री म्हणाला.
'ह्या मनुष्याला कधी सोप्या मराठीत बोलताना पाहीलयं' असं शपथेवर सांगणारा चाळकरी अजून भेटायचाय. म्हणजे 'घड्याळात बारा वाजले' हे सांगायचं झालं तर हा म्हणेल, "कालदर्शक यंत्रातील तिन्ही काटे ऊर्ध्वदिशेस मार्गक्रमणा करीत बाराच्या अंगावर दाटीवाटीने उभे आहेत."
त्याच्या याच स्वभावाला वैतागून बायकोने म्हणे याला 'टाकले', अशी सबंध चाळीत वदंता आहे.
एकदा बांधलेला टाय वश्यानं पुन्हा सोडला.
"काय रे, काय झालं?"
"समोसा व्यवस्थित आला नाही."
"समोसा?"
"टायच्या गाठीचा आकार समोश्याप्रमाणे त्रिकोणी यायला हवा, तर म्हणावा टाय बांधून झाला, अन्यथा नाही."
या भौमितिक नियमानुसार मी मघाशी टायला मारलेल्या गाठी जिलेबीच्या आकाराच्या आलेल्या असाव्यात, याची मला पक्की खात्री पटली.
मग वश्याने दुसर्याच प्रयत्नात टाय बांधून दिला आणि माझा गळा दाटून आला.
सोबत मला टायसंबंधी एक मोफत टिपही मिळाली. ऑफीसातून घरी आल्यावर टायची गाठ जराशी सैल करून टाय अलगद काढून ठेवावा. दुसर्या दिवशी ऑफीसला जाताना टायची गाठ घट्ट केली की झालं !
दुसर्याच दिवशी टाय बांधलेला मी वागळेंच्या घरासमोरून ताठ मानेनं गेलो. पण श्या ! त्यांचं दार बंद होतं. बघतिलच कधीतरी माझी टाय ! अशी मनाची आणि सौ.ची समजूत काढून मी ऑफीसला गेलो.
सगळ्यांच्या गळ्यात टाया पाहून नवा साहेब सुखावला.
"वा ! आज एक माणुस जंटलमन दिसतोय." ऑफीसातल्या केशरने ओठांचं चुंबन करत म्हटले.
मी तिच्या स्तुत्य टिकेकडे लक्ष न देण्याचं ठरवलं.
लंचला आम्ही मित्र आपापले डबे खात होतो. तोंडी लावायला टायचा विषय पुरेसा होता.
"माझा एक मित्र खिशात रूमाल असूनदेखील खुशाल टायनेच शेंबुड पुसतो." आमच्यातल्या एकाने त्याच्या मित्राचा वेंधळेपणा सांगितला.
"नाकाजवळ रुमालाच्या आधी टाय जलद पोहचू शकतो, असा साधा सोपा हिशेब असावा त्याचा." माझ्या या सिद्धांतावर उपस्थित मंडळींत एकच हशा पिकला.
आमचं टोळकं या हास्यरंगात बुडालेलं असताना आमच्यातल्याच एकाची टाय त्याच्याच डब्यातल्या आमटीत जाऊन कधी बुडाली? हे त्या टायला देखील कळाले नसेल.
"जा. 'टाय'पर बदलून ये." माझ्या या 'बाळ'बोध विनोदावर तर 'टायफ्राईडग्रस्त' मित्रासह इतर मित्रगण ऑफीस सुटेपर्यंत हसत होते, असं मला दिसून आलं.
तो सबंध दिवस टायसंबंधीचे किस्से सांगण्यात निघून गेला.
वश्याच्या तालमीत मला काही दिवसांत नीटनेटका टाय बांधता येऊ लागला आणि सौ.च्या निरीक्षणानुसार हल्ली माझ्या टायला बर्यापैकी 'समोसा'पण येऊ लागलाय ..!

Wednesday, March 14, 2012
आइए. 'शॉक' फर्माइए..!
आग, वीज आणि पाणी या तीन गोष्टींशी माणसाने कधीही खेळू नये.'
जन्माला आल्यापासून समजायला लागल्यानंतर आमच्या घरातील वडीलधार्या मंडळींनी आम्हाला पोलिओनंतर जर कुठले डोस पाजले असतील, तर ते हेच 'उपदेशाचे डोस'..!
आता अगदी भोवरा फिरवण्यापासून आमचा आवडता 'डॉक्टर डॉक्टर' (या खेळात शेजारची सुमी पेशंट बनण्यास तयार झाल्यावर गोपाळ आणि माझ्यात डॉक्टर बनण्यासाठी प्रसंगी 'कुस्ती' नावाचा तिसराच खेळ होऊन जायचा.) इथपर्यंत इतके नाना प्रकारचे खेळ असताना आम्ही आग, वीज आणि पाण्याशी का खेळावे? हे समजायला मार्ग नव्हता.
आग आणि पाण्याचं ठाऊक नाही, पण वीज आमच्या गावात गेली कित्येक वर्षे एक खेळ नियमित खेळत असते. त्या खेळाचं नाव... 'लपंडाव'..!
अखेर खेल खेल में तो प्रसंग आलाच.
रविवारची एक सकाळ. उद्या म्हणजे सोमवारी ऑफिसात सुझीचा वाढदिवस असल्यामुळे रोजच्या चुरगाळलेल्या कपड्यांना इस्त्रीच्या उष्ण पोटाखालून चिरडून काढणे गरजेचे होते. त्यानुसार उजव्या कोपर्यात आपल्या पाठीवर असंख्य वस्तू बाळगलेल्या एका टेबलावरील ओझे हलके करीत ओढत - ओढत नेऊन तो टेबल इलेक्ट्रिक बोर्ड असलेल्या भिंतीला चिकटवला आणि त्यावर शुभ्र चादर पसरून त्याचा यथोचित सन्मान केला.
इस्त्रीची पिन इलेक्ट्रिक बोर्डात जोडून बटणाची मान खाली झुकवली आणि काही क्षणांत इस्त्री शर्टात झुरळासारखी इकडे-तिकडे फिरू लागली.
मी स्वप्नांत तो कडक इस्त्रीचा शर्ट घालून सुझीला बुके देणारच होतो, इतक्यात...बायकोने एक साडी आणून टेबलवर आपटली.
त्या बुकेतली फुलं बायकोच्या साडीवर कशी काय बुवा सांडली? या विचारात मी पडलो.
"अहो जरा एवढी साडीपण इस्त्री करा." केसांना साईबाबांसारखा टॉवेल गुंडाळलेली सौ. हातातील जळती अगरबत्ती हवेत फिरवत म्हणाली.
मी प्रश्नार्थक नजरेने निव्वळ तिच्याकडे पाहिले.
"संध्याकाळी भगिनी मंडळात जायचंय." ती अगरबत्ती मला टेकणारच होती.
"अगं मग इस्त्रीवाल्याकडे द्यायची होतीस ना..!" इस्त्री आणि मी सारखेच गरम झालो होतो.
"मढं बसू दे त्या इस्त्रीवाल्याचं..! मागच्या महिन्यात नाही का आपण शालूच्या लग्नाला गेलो होतो?"
"हो. हो. गेलो होतो खरे." पण इस्त्रीवाल्याचं मढं आणि शालूचं लग्न यांचा संबंध मला कळेना.
मी तिथे जेवताना काजू समजून लसूण खाल्ला होता, हे मला चटकन आठवलं. सौ. त्याचीच तर आठवण करून देत नसावी? असा मला संशय आला.
"तेव्हा मी त्या इस्त्रीवाल्याकडे तुमच्या शर्टला मॅचिंग असलेली साडी इस्त्री करायला दिली होती. तर त्या गाढवानं त्या साडीला किचनमधल्या खिडकीच्या आकाराएवढं भगदाड पाडून आणलंन." अगरबत्तीच्या जळत्या टोकाइतके सौ. चे डोळे लाल झाले होते.
सौ. चा मुद्दा माझ्या लक्षात आला. मी तिच्या साडीला इस्त्री करून देण्यास तयार झालो. माझ्या शर्ट - पॅन्टची इस्त्री आटोपून मी साडी इस्त्री करू लागलो.
दहा-पंधरा मिनिटे झाली असतील.
'या जगात स्त्रीचा कधीच भरवसा नसतो', तेवढ्या वेळात माझ्या मनात हा एकमेव विचार चमकून गेला.
"अहो, हे काय?" सौ. च्या या वाक्याने माझी तंद्री भंग पावली.
"काय झालं?" मी जरा घाबरतच विचारले.
माझ्याकडून साडीवर दुसरी खिडकी तर तयार झाली नाही..!
"इतका वेळ झाला. अजून पदरच इस्त्री करताय..!"
मी एक क्षण साडीकडे पाहिले. पदरावरच्या जरतारीच्या नाचर्या मोराची चुरगाळलेली पिसे सरळ करण्यात इस्त्री मग्न होती.
मला आता कळलं, हल्लीच्या बायका शर्ट - पॅन्ट का घालतात ते..!
"अरेच्चा होय की..! आताशा पदरावरचा 'मोर'च हाय. खरी साडी अजून 'म्होर'च हाय." इस्त्रीसोबत आता मला फाल्तू कोट्या करण्याचादेखील मूड आला.
मी इस्त्रीस स्पर्श केला मात्र...
मला एकदम धक्का बसला. एखाद्याच्या गंजीत (काही सुशिक्षित लोकं जिला बनियन संबोधतात.) बर्फाचे तुकडे टाकल्यावर तो ज्या उत्साहाने सबंध शरीराची हालचाल करील, तशीच विचित्र हालचाल मी आता करीत होतो.
माझे केस निवडणुकीतल्या उमेदवारासारखे 'उभे' राहिले होते.
विजेच्या संपर्कात येऊन मला शॉक लागला होता.
एकूणच शॉक हा संपर्कजन्य रोग आहे, हे माझ्या चांगलेच लक्षात आले आणि जगात स्त्री आणि इस्त्री या दोन गोष्टींचा कधीच भरवसा नसतो, या निष्कर्षाप्रत मी पोहोचलो.
तेव्हापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा मी धसकाच घेतला. साधं पंख्याचं बटण दाबायचं झालं तरी पायात चपला सरकवतो. याआधी मी केवळ विजेच्या बिलाची धास्ती घ्यायचो.
कोणतीच गोष्ट पोटात अधिक काळ न राहण्याची दैवी देणगी लाभलेल्या सौ.द्वारे माझं हे 'करंट अफेअर' संध्याकाळपर्यंत सबंध चाळीत पसरलं आणि मी एक 'शॉकीन माणूस' म्हणून प्रसिद्ध पावलो.
चाळीतील काही रणबीर कपूर प्रेमी तरुणांनी मला 'शॉकस्टार' ही पदवी बहाल केली.
त्या दिवशी सौ. भलतीच घाईत दिसत होती.
"अहो, ठक्कर मॉलमध्ये सेल लागलाय." एवढंच बोलून सौ. एव्हरी डे चे सेल टाकल्यासारखी पळतच गेली.
काय 'सेल'फिश बाई आहे..! अशी एक कोटी चटकन मला सुचली.
आज ही काय उचलून आणणार आहे? या प्रश्नानेच मी घामाघूम झालो. मागे तिने सँडलवर फ्री होते म्हणून माझ्यासाठी मौजांची जोडी आणली होती.
पण जेव्हा ती मॉलमधून परतली तेव्हा तिच्यासोबत एक सुंदर देखणी बाई होती. ती सुंदर देखणी बाई सौ. ची शाळेतली मैत्रीण होती आणि तिचा नुकताच आंतरजातीय विवाह झाला होता.
आमच्या घरातील पाहुणचार झोडून तिने आम्हा उभयतांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.
त्याप्रमाणे आम्ही उभयतां तिच्या घरी येऊन ठाकलो. सूक्ष्म निरीक्षणाअंती माझ्या असे लक्षात आले की, तिच्या नवर्याच्या डोक्यावरील केसांच्या तुलनेत माझ्या डोक्यावरील केसांची संख्या समाधानकारक होती. या आनंदात मी सौ. ने या खेपेला मॉलमधून इअरिंग्जच्यासोबत फ्री म्हणून आणलेल्या कंगव्याने केस विंचरले.
"यांना नॉन व्हेज चालेल ना?" सौ.च्या मैत्रिणीने अन'नॉन' नजरेने माझ्याकडे पाहत सौ. ला विचारले.
"नाही बाई. आमचे हे किनई शुद्ध 'शॉका'हारी आहेत." सौ. ने माझा परा'कोटी'चा अपमान केला. वर आपल्या दातांचं दर्शन देत यथेच्छ हसली.
सौ. माझ्यासारखं कोटी करायला शिकली होती, याचा मला आनंदच होता, पण तिने खुद्द माझ्यावरच कोटी केली, याचा राग त्या आनंदापेक्षा जरा जास्तच होता.
झाल्या प्रकाराने घरी गेल्यावर आमच्या दोघांत तुडुंब भांडण झालं आणि त्याची परिणती सौ.च्या माहेरी जाण्यात झाली. यावेळी मला दुसर्या प्रकारचा शॉक बसला.
मी प्रचंड दु:खी झालो. रात्री - अपरात्री निर्मनुष्य सडकांवर उदासवाणा भटकू लागलो. मला वेड लागलंय, असा स्वतःचा समज करून घेऊन आमच्या शेजारचे परांजपे मला कसलीही पूर्वसूचना न देता एका वेड्यांच्या रूग्णालयात घेऊन गेले.
आम्ही डॉ. च्या केबिनात प्रवेश केला तेव्हा डॉ. वेड्यासारखे हसताना आम्हाला दृष्टीस पडले. ते चांदोबातील विनोद वाचत होते, याचा उलगडा नंतर झाला. त्यांच्या समोरील टेबलावर DR. ASHOK अशा नावाची पाटी होती. मला मात्र त्या पाटीवरील ती अक्षरे A SHOCK अशी दिसू लागली.
नंतर तिथल्या एका अर्धवट कंपाउंडराने मला एका खोपटेवजा खोलीत नेले.
"आइए मेहरबान
लेटीए जानेजाँ
'शॉक' से दिजीए जी
इष्क की इम्तिहान" तिथल्या एका चादराच्छादीत कॉटकडे बोट दाखवत तो आपल्या भसाड्या आवाजात म्हणाला.
त्याच्या या गाण्यातील सूचक ओळीतून 'मी पुन्हा शॉकचा शिकार होणार आहे' हे मला कळून चुकले आणि त्याप्रमाणे माझ्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हातापायाच्या बोटांवर मोजता येणार नाही इतक्या वेळा मला शॉक दिला.
मी बेशुद्ध पडलो.
शुद्धीवर आलो तेव्हा सौ. आणि तिच्या माहेरचा गोतावळा सुतकी चेहरे करून माझ्या कॉटभोवती गर्दी करून बसला होता.
सौ. चे डोळे रडून रडून उकडलेल्या बटाट्यासारखे सुजले होते.
"तुम्ही सगळे असे का बसलाय? ही काय शोकसभा आहे का?" परांजपेने तिथल्या जीवघेण्या शांततेचा भंग केला.
"मला वाट्टं परांजपे, ही शोकसभा नसून 'शॉक'सभा असावी." तशा प्रसंगीदेखील कोटी करण्याचा मोह मला अनावर झाला.
यावर उपस्थित मंडळी दिलखुलास हसली. त्यांना हसता येत होते, हा नवा शोध मला लागला.
मी आणि सौ. जेव्हा त्या खोपटेवजा खोलीतून बाहेर पडलो, तेव्हा मी एकवार वळून त्या खोलीकडे पाहिले. त्या खोलीच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरांत लिहिले होते...
आइए. शॉक फर्माइए..!
* * *
हास्यगाऽऽरवा २०१२ मध्ये पुर्वप्रकाशित

Sunday, January 1, 2012
सायकल
माझ्या दोन इच्छा आहेत. हो इच्छाच..! स्वप्न नाही म्हणू शकत कारण, मला जी काही विचित्र स्वप्नं पडतात त्यांची पुर्तता होणे, ही गोष्ट आमच्या सौ. ने सुग्रास भोजन बनवण्याइतकी अशक्य आहे.
मागे मला 'मी व्हाईट हाऊसमध्ये राहतोय' असलं अतिरेकी (की अमेरिकी?) स्वप्न पडलेलं मी माझा परमप्रिय मित्र गोपाळला सांगितलं.
त्याने गंभीर सिनेमात घेतात तसा मोठ्ठा पॉज घेण्याची आपली 'वाईट हौस' पुर्ण करून घेतली.
"अरे मग त्यात काये..! घराला सफेद रंग लाव. व्हाईट हाऊसमध्ये राहत असल्याचा फील येईल." असं म्हणून हिरव्यागार गवतातून दोन ससे बाहेर पडावेत, तसे झुपकेदार मिशीआडून पुढे आलेले दोन दात आणखीनच बाहेर काढत गोपाळ हसला.
त्याच्या श्रीमुखात भडकावून त्याला दिवसा तारे दिसल्याचा 'फील' आणावा, असा उग्र विचार त्याक्षणी माझ्या मनात उत्पन्न झाला होता. 'फील'हाल तो विचार मी तेव्हा मनातून रहीत केला.
असो. तर माझ्या त्या दोन इच्छा पुढीलप्रमाणे आहेत.
एक.... सायकल चालवायला शिकणे आणि दूसरी..... पोहायला शिकणे.
पैकी पोहायला शिकण्यासाठी मी पाण्यात हात - पाय मारून पाहीले, परंतू जशी पाण्याने माझ्या नाका - तोंडात 'एंट्री' घेतली तशी मी पाण्यातून 'एक्झीट' घेतली.
तदनंतर जेव्हा कधी आम्हां मित्रांची टोळी दगडू मळेवाल्याच्या आडात डुंबायला जायची तेव्हा मी आडाजवळच्याच एका कातळावर बसून डुंबणार्या मित्रांचे वस्त्र सांभाळत बसे.
अशारितीने माझ्या पोहण्याच्या इच्छेवर 'पाणी' सोडून मी मनात 'भुल जा स्वीम स्वीम' म्हणालो अन् आपला मोर्चा सायकलकडे वळवला.
आमच्या गावात तेव्हा सर्वात जास्त काळ सायकलवर हिंडणारा एकमेव प्राणी म्हणजे पोस्टमन. तो कधी आमच्या घरासमोरून आपल्या सायकलची घंटी वाजवत गेला म्हणजे मला त्याचा मोठ्ठा हेवा वाटे.
तशी आमच्या चुलत्यांची सायकल होती म्हणा. पण आता ती चालण्याच्या स्थितीत नव्हती. आपले पंक्चर झालेले दोन्ही पाय गळून पडलेल्या अवस्थेत ती कित्येक वर्षे आमच्या घराच्या पाठीमागील भिंतीला टेकून उभी आहे.
शेजारच्या गावातल्या यश्टी स्टँडवर सायकल रिपेरिंगचं एक दूकान होतं, तिथं ती रंजलेली - गांजलेली (की गंजलेली?) सायकल नेवून दोन्ही टायरचे पंक्चर काढले, ब्रेकचं काम केलं. तिथचं मी जमा केलेले पैसे संपले.
सायकलची सीट उखडलेली असणे, पेडलचे रबर जावून नुसतीच ती लोखंडी गुळगुळीत नळी शिल्लक राहणे इ. इ. छोटे मोठे दोष अजून तसेच होते.
असू देत. जसे पैसे जमतील तसे एक - एक काम करत जाईन, मी आपल्या मनाची समजुत काढली.
मला कधी एकदा सायकल शिकतोय असं झालं होतं. सायकल शिकेपर्यंत कुणीतरी सायकल पकडणं आवश्यक होतं. मी गावातील अनेक गल्ल्या हिंडून काही मित्रांना बोलावून आणले.
"आधी मला एक राऊंड पायजे." या अटीवर प्रत्येकाने माझ्या सायकलवर टांग टाकून माझं घर ते खालच्या आळीपासून मैलभर असलेल्या स्मशानापर्यंत एवढा मोठ्ठा राऊंड मारून नंतर "माझ्या आईने मला बाजारातून अमुक आणायला सांगितलयं","माझ्या बापानं मला शेतावर बोलवलयं." अशी कारणे सांगून त्यांनी आधी जशी सायकलला टांग दिली, तशीच आता मलापण टांग दिली.
ते 'टांगदेव' झाले तेव्हा मी भिंत चालवणार्या ज्ञानेश्वरांसारखा निदान सायकल चालवणे तरी गरजेचे झाले.
आता उरलो होतो फक्त मी आणि माझी सायकल.
एकलव्याने जशी गुरूविना एकट्यानेच धनुर्विद्या आत्मसात केली तशी मीदेखील एकट्यानेच सायकल शिकण्याचा निर्धार केला.
सायकलवर टांग टाकून जरा घाबरतच पेडल मारले. डोळे कधीच गच्च मिटले होते. काही वेळाने हळूहळू डोळे उघडले आणि काय आश्चर्य..!!
मी सराईतपणे सायकल चालवत होतो.
ढोपरं न फोडता पहील्याच प्रयत्नात सायकल शिकणारा जगात बहुधा मी एकमेव असेन.
मग काय विचारता? गावातली कुठली गल्ली अशी बाकी नसेल जिथे माझ्या सायकलच्या चाकांच्या रेषा उमटलेल्या नसतील.
काही दिवसांत मी रायडर की काय म्हणतात? तो झालो. आईपण माझ्यावर खुश होती. म्हणजे याआधी कुठलही काम करण्यासाठी टाळाटाळ करणारा मी कधी दुकानातून सामान घेवून ये, कधी चक्कीत दळण टाकून ये इ. कामे सायकलवरून त्वरीत आणि आवडीने करू लागलो.
आता मी सायकलने उतारावरून जाताना बिनधास्त पेडलवरले पाय काढून हँडलवर ठेवू शकत होतो. हँडलवरले हात काढून सिनेमातल्या हिरोसारखे केसांतून फिरवू शकत होतो.
एकदा मात्र वाईट घडलं.
असचं उतावरून सायकलने सुसाट जात असताना मी सीटवरून उठून पेडलवर उभा राहुन अंगभर वारा झेलत राहीलो.
उतार संपला तसा मटकन सीटवर बसलो मात्र.. माझ्या पार्श्वभागात सीटखालील उभी लोखंडी नळी योग्य जागा बघून थेट घुसली. तेव्हा माझ्या लक्षात आले, सायकलची सीट वरचेवर अशी निघतेच.
आता ती सीट दणका सहन न झाल्याने मागे काही अंतरावर सायकलवरून उडी मारून धुळीत लोळत पडली होती.
पुढे काही दिवस मला परसाकडे बसायला प्रचंड त्रास होत होता.
ही एक दुर्दैवी घटना सोडली तर सायकलने मला कधी कुठलीही इजा केली नाही.
माझी सायकलमधील प्रगती पाहूनच की काय? सुमीने पक्याचा पत्ता कापून माझ्याशी जवळीक वाढवली. हळूहळू ती माझ्यावर पक्याच्या भाषेत सांगायचं झालं तर 'लव' करू लागली. माझ्याही तिच्या घरापुढील सायकल फेर्या वाढल्या.
सुमीला सायकलवर फिरवण्याची माझी कैक दिवसांपासूनची इच्छा अखेर एके दिवशी पुरी झाली.
आदल्या दिवशी मी तिला जास्त गजबज नसलेल्या गावाबाहेरच्या कच्च्या रस्त्यावर दुपारी भेटावयास बोलवले. दूपारच्या वेळी त्या रस्त्याला शुकशुकाट असतो.
मी शर्ट इन वगैरे करून तयार झालो आणि सायकलवर टांग टाकून झपाझप पेडल मारीत गावाबाहेरच्या त्या रस्त्याच्या दिशेला लागलो.
"अरे चेन उतरलेय बघ." रस्त्याने गावाकडे जाणारा चंदन आळीतला परश्या माझ्याकडे बघत बोलला.
मी सायकल न थांबवता खाली पाहीले. सायकलची चेन आपल्या जागेवर व्यवस्थित फिरत होती.
मग परश्या असं का बोलला? या प्रश्नानं मी प्रचंड बे'चेन' झालो.
नंतर माझ्या लक्षात आलं, तो सायकलच्या चेनबद्द्ल बोलत नसून पॅन्टच्या चेनबद्द्ल बोलत होता. मी पॅन्टची खिडकी बंद केली आणि वाटेला लागलो.
बरं झालं बाबा..! परश्या अगदी ते 'आसमान से आया फरीश्ता' म्हणतात ना, तसा फरीश्ता बनून आला. नाहीतर सुमीसमोर माझी कोण फजिती झाली असती..!
रस्त्यावर पोचलो तेव्हा सुमी आपली मा'सुमी'यत चिंचेच्या झाडाला टांगून त्यावर दगड फेकून चिंचा पाडताना दिसली. त्यातला एक अणुकुचीदार दगड माझ्या कपाळाच्या दिशेनेपण आला. मोठ्या चपळाईने मी तो चुकवला.
तिच्या त्या प्रयत्नाचं 'फळ' तिच्या पेटीकोटाचा निम्मा खिसा भरून तिला 'चिंचा' या रूपात प्राप्त झाला होता.
"अगं जरा बघून फेक दगडं. कुणाचं कपाळ फुटलं म्हंजे?" सायकल एका झाडाला टेकत मी.
"आता ही सायकल डेपोला कशाला लावली? प्यांसेजर केवापासून खोळंबलयं इथं..!" कमरेत बेअरिंग बसवल्यासारखी या दिशेकडून त्या दिशेकडे फिरत नाही - नाही म्हणणार्या पंख्यासारखी फिरत सुमी बोलली.
आता इतकं देखणं 'प्यासेंजर' समोर असताना वाहन डेपोला लावणं, हे म्हणजे बायकोची एखादी सुंदर तरूण मैत्रीण घरात आलेली असताना आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढून ड्रॉवरमध्ये ठेवण्यासारखे आहे.
मी लागलीच सायकल रस्त्यावर आणून तीवर टांग टाकली.
"बैस मागे." मी आपली मान मागे वळवत सुमीला बसण्यास सांगितले.
"मी नाय मागं बसनार." सुमी आपल्या दोन वेण्या हलवीत म्हणाली.
"मग?"
"मला फुडं बसायचयं." वेण्यांचा झोपाळा थांबला होता.
"अस्सं..! मग बस पुढं." दैवाला आणि मला हेच अपेक्षित असावं.
सुमी एकाच बाजूला दोन्ही पाय ठेवून हँडल पकडीत सायकलच्या समोरील दांडीवर बसली. मी ताकदीने पेडल ढकलीत सायकल पळवू लागलो.
क्षणाक्षणाला हँडलवरील सुमीच्या कोमल हातांना माझ्या हातांचा स्पर्श होत होता.
सुमीने एकदम टायटानिक सिनेमातल्यासारखे आपले दोन्ही हात हवेतपण पसरवले. सुमीला खुप मजा येत होती. कधी तिच्या केसांतला खोबरेल तेलाचा वास माझ्या नाकात शिरत होता, तर कधी तिच्या वेणीला बांधलेल्या रिबीणीचं एखादं टोक माझ्या नाकात शिरून मला शिंका आणीत होता.
एकंदर सगळीच मौज होती. सायकलवर मनसोक्त हिंडून झाल्यावर आम्ही दोघे भेंडीच्या झाडाखाली विसावलो आणि सुमीने आपल्या पेटीकोटच्या खिशातून मघाशी पाडलेल्या काही चिंचा काढुन मला दिल्या. आम्ही डोळे गच्च मिटत चिंचा खाल्ल्या आणि घराकडे परतलो.
त्याच संध्याकाळी सुमीचा बाप तोंडात शिव्यांची कॅसेट टाकून उच्च आवाजात आमच्या घरापुढे धिंगाणा घालीत होता. चंदन आळीतल्या परश्याने दुपारी आम्हां दोघांना सायकलवर हिंडताना पाहीलं होतं आणि जावून जशीच्या तशी हकीगत सुमीच्या बापाच्या कानात सांगितली होती, हे त्या धिंगाण्यातून मला कळाले.
मघाशी माझा 'फरीश्ता' असणार्या परश्याने आता मात्र 'रिश्ता' तोडून टाकला होता.
कणेकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर, माझ्या चुन्याच्या डबीएवढ्या छातीत धडकी भरली.
माझ्या वडीलांनी प्रसंगावधान राखून सुमीच्या बापाला आमच्या घरात नेवून बराच वेळ त्याची समजूत काढली तेव्हा कुठं तो चावी दिलेल्या खेळण्यासारखा गुमान त्याच्या घराकडे गेला.
अखेर 'मी सुमी राहते त्या गल्लीत पाऊल जरी टाकलं, तरी माझ्या तंगड्या तोडण्यात येतील.' (तोडल्यानंतर पाय.. पाय न राहता तंगड्या होतात, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.) या माझ्या वडीलांच्या धमकीने त्या प्रकरणाला पुर्णविराम मिळाला.
या घटनेने मी बराचसा निराश झालो.
त्यावेळी माझ्या त्या स्थितीच्या बॅकग्राऊंडला
तेरी गलियों में ना रखेंगे कदम
आज के बाद...
हे गाणं फीट्टं बसलं असतं.
आता मला सायकल फिरवण्यात कसलीच मौज वाटेना. मी नुसताच गावाबाहेरच्या त्या कच्च्या रस्त्यावरून उदासवाणा चकरा मारे.
परवा सायकलवरून प्रचंड वेगात खालच्या आळीला जाताना रस्त्यात एक म्हैस उभी असलेली लांबुनच मला दिसली. मी सायकलची घंटी बडव बडव बडवली. म्हैशीच्या कान आणि शेपटीखेरीज काहीच हलले नाही. मी म्हैशीच्या अधिक जवळ जाऊ लागलो. एकीकडे घंटी वाजवणं सुरूच होतं, पण म्हैस ढिम्म..!
एक क्षण तर असा आला की, मी म्हशीला धडकणारच होतो पण चपळाईने मी सायकलचा हँडल फिरवला आणि म्हशीच्या शेजारून हाती टमरेल घेवून परसाकडे निघालेल्या अंता चौगुल्याला मी सायकलसकट धडकलो.
अंत्या चौगुले टमरेलासकट किक मारलेल्या फुटबॉलसारखा जमिनीपासून काही फुट उंच उडत रस्त्यालगतच्या काटेरी कुंपणात जाऊन पडला. त्याच्या सर्वांगाला काट्यांनी चुंबन घेवून त्याला रक्तबंबाळ केलेले पाहून माझ्यापण अंगावर दुसर्या प्रकारचा 'काटा' आला.
अंता चौगुले महाभारतातल्या भीष्माप्रमाणे कुंपणावर आडवा झाला होता. फरक इतकाच होता, तिथे बाण होते.... इथे काटे होते.
"भो***..! ब्रेक नाय का मारता येत?" अपशब्दांच्या कोशातील निवडक विशेषणाने सुरूवात करत अंता चौगुले बोलला.
"अख्खी सायकल तर मारली. अजुन ब्रेक काय वेगळा काढून मारू?" माझ्या या उर्मट उत्तराने अंता चौगुल्याचे डोळे आग ओकू लागले आणि त्याच्या तोंडाच्या गटारात तुंबलेल्या शिव्यांना बाहेर येण्यास वाट मिळाली.
तोपर्यंत बघ्यांची संख्या बर्यापैकी वाढली होती. त्यातल्याच काहींनी काट्यात उमललेलं फुलं वेचुन काढावं, इतक्या हळूवारपणे अंता चौगुल्याला कुंपणाबाहेर काढून गुणा धुमाळाच्या बैलगाडीत घालून इस्पितळात दाखल केलं.
माझा हा पराक्रम परमपुज्य वडीलांच्या कानी गेलाच होता.
त्यांनी हात दुखेपर्यंत मला बडवले... त्यांचे हात दुखेपर्यंत..!
काही दिवसानंतर वडीलांनी काही रूपयांच्या बदल्यात माझी सायकल एका भंगारवाल्याला देवून टाकली.
एक सायकल आता इतिहासजमा झाली होती.

Thursday, July 21, 2011
आज उनसे पहली मुलाकात होगी.
रेड चिली इज ऑनलाईन..
संगणकाच्या उजव्या कोपर्यातून ह्या मॅसेजने क्षणभर डोके वर काढले आणि लुप्त झाला.
आली.. आली... माझी प्राणप्रिय सखी ऑनलाईन आली.
'रेड चिली' ही माझी ऑनलाईन मैत्रीण. ती माझ्यासाठी 'रेड चिली' अन मी तिच्यासाठी 'व्हाईट टायगर'. गेली कित्येक महीने आम्ही एकमेकांशी आपली सुख-दू:खे शेअर करतोय. आमच्यात एक प्रकारचं नातं निर्माण झालयं. काय नाव द्यावं बरं त्या नात्याला? एक न दिसणारं नातं... अदृष्य नातं.
तिच्याशी बोलल्याखेरीज (रविवार वगळता) माझा एक दिवसही जात नाही.
काय गंमत आहे पहा..! हल्ली आपल्या भोवताली वावरणार्या व्यक्तींशी आपला संवाद हाय-हॅल्लो पलीकडे जात नाही पण संगणकाच्या स्क्रीनवर केवळ काही अक्षरांच्या रूपात दिसणार्या अदृष्य व्यक्तीशी मात्र आपण तासनतास बोलत राहतो.
व्हाईट टायगर - हाय.
बराच वेळ गेला. आयला..! ही ऑनलाईन तर दाखवतेय. मग माझ्या 'हाय'ला रिप्लाय का देत नाहीए?
व्हाईट टायगर - हाय वन्स अगेन. आर यु देअर?
रेड चिली - हाय.
कमाल आहे..! मी केवळ 'हाय' म्हटल्यावर नेहमीच 'हाय रे माझ्या पांढुरक्या वाघोबा' असं म्हणणारी ही आज केवळ 'हाय' म्हणून थांबते.
व्हाईट टायगर - काय झालं? बरं वाटतं नाहीए का आज?
रेड चिली - ठिके.
व्हाईट टायगर - मग आज बोलत का नाहीएस माझ्याशी नीट?
पुन्हा बराच वेळ चॅटविन्डो सुनी.
आज झालयं तरी काय हिला? अशी का वागतेय ही आज?
हम्म.. आलं लक्षात.
व्हाईट टायगर - नवर्यासोबत भांडण झालं का?
रेड चिली - हम्म..
'हम्म' च्या पुढे दू:ख व्यक्त करणारी 'स्मायली'..!
तरी मला वाटलचं, हीचं नवर्याबरोबर काहीतरी बिनसलं असणारं. आठवड्यातील तीन-चार वार हे घडतच.
व्हाईट टायगर - यात नर्व्हस होण्यासारखं काये? आता माझचं बघ. माझंही माझ्या बायकोशी सकाळी वाजलं, पण मी आहे का दू:खी?
रेड चिली - ए देवाने आपल्याच बाबतीत असा अन्याय का केला रे?
व्हाईट टायगर - तुझ्या भावना मी समजू शकतो.
रेड चिली - फार सहन करते रे मी माझ्या नवर्याला.
व्हाईट टायगर - मी तर अक्षरश: झेलतोय.
रेड चिलीकडून स्मितहास्य व्यक्त करणारी स्मायली.
रेड चिली - अगदीच गंभीर कारणं असतात का रे तुमच्या भांडणाची?
व्हाईट टायगर - ऊं.. हूं..! अगदी क्षुल्लक कारणदेखील पुरे. म्हणजे जेवणात आज अमुक एक भाजीच का? इथपासून ते अगदी डोअरबेल वाजल्यावर दरवाजा कुणी उघडायचा? इथपर्यंत कोणतही कारण आमच्या भांडणास वर्ज्य नाही. कुणीतरी म्हटलयं ना.. रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग..! अगदी तसचं.
रेड चिलीकडून पुन्हा स्मितहास्य करणारी स्मायली.
रेड चिली - आमच्याकडेही याहून निराळी परिस्थिती नाहीए.
व्हाईट टायगर - मरू दे. आपण का उगाच 'कहानी घर घर की' चा एपिसोड इथे ऐकवतोय. चेंज द टॉपीक.
चॅटविन्डो काहीकाळ पुन्हा सुनी.
रेड चिली - ए आपण भेटूया का रे?
व्हाईट टायगर - यु मीन 'प्रत्यक्ष'?
रेड चिली - नाहीतर काय अरे? प्रत्यक्षच..! खुप दिवसांपासून हा विचार माझ्या मनात आहे. म्हणजे हे असं अंदाजे एक चेहरा गृहीत धरून केवळ शब्दरूपी त्याचं अस्तित्व आहे, म्हणून त्याच्याशी मन मोकळं करायचं. तूला कसं वाटतं?
व्हाईट टायगर - का नाही.! जरूर भेटूया. आता दर्शन देण्याची वेळ आलीच आहे.

रेड चिली - पण कुठं भेटायचं आपण?
व्हाईट टायगर - तूला फाऊंटनला यायला जमेल?
रेड चिली - फाऊंटन? ओके. जमेल.
व्हाईट टायगर - मग ठरलं. शनिवारी सकाळी अकरा वाजता तू फाऊंटनला..... कुठे बरं? हं..! कॅफे बहारच्या बाहेर थांबायचसं.
हे बरयं. म्हणजे भेट झाली की लागलीच कॉफी पिण्यासाठी गळ घालायची.
रेड चिली - ए पण मी तूला ओळखणार कसं?
व्हाईट टायगर - एक काम करूया. आपण एकमेकांना आपापले फोटो पाठवूयात.
रेड चिली - ए नको रे. अशाने आपल्या भेटीतलं थ्रील कमी होईल. उलट आधी फोटो वगैरे न पाहता अचानक आपण एकमेकांसमोर आलो ना की कोण मज्जा येईल..!
व्हाईट टायगर - अॅज यु विश. वास्तविक 'भेटीतलं थ्रील' ही कल्पना मलाही प्रचंड आवडलीय.
रेड चिली - तूझा ड्रेसकोड सांग ना.
व्हाईट टायगर - ड्रेसकोड... ए मी कमरेला फक्त केळीची पाने गुंडाळून येतो, म्हणजे ओळखायला सोप्पं जाईल.
रेड चिली - श्शी..! हे काय रे भलतचं. फॅन्सी ड्रेस कॉम्पीटिशनला येणारेस का? नको बाई असलं काही.
व्हाईट टायगर - अगं गंमत केली. फिक्कट निळा शर्ट आणि क्रीम कलरची पँट. वाटल्यास दबंगमधल्या सलमानसारखा पाठीमागे कॉलरला गॉगल अडकवतो.
रेड चिली - दबंगगिरी वगैरे नको हं.!
व्हाईट टायगर - ओके. मग ठरलं तर, शनिवारी सकाळी ठीक अकरा वाजता फाऊंटन येथील कॅफे बहार.
रेड चिली - ओके. बाय.
व्हाईट टायगर - बाय.
रेड चिली इज ऑफलाईन.
*
उद्या आमच्या ऑफीसात एकाची फेअरवेल पार्टी आहे. मला उद्या डबा नकोय. शुक्रवारीच संध्याकाळी सौ. ला अशी थाप मारली.
शनिवार उजाडला.
दाढी उरकून ठरल्याप्रमाणे फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि क्रीम कलरची पँट असा पोशाख करून मी घराबाहेर पडलो. सौ. आधीच ऑफीसला निघून गेली होती.
आज उनसे पहली मुलाकात होगी
फिर आमने सामने बात होगी
आज मी एकदम वेगळ्याच विश्वात होतो. म्हणजे यापुर्वी माझा 'आज' असा कधी उजाडलाच नव्हता. मी आतापर्यंत जगलेली सगळी मिळमिळीत वर्षे एकीकडे आणि तिच्या भेटीची आस असलेला 'आज' एकीकडे...
साधारण पाच मिनिटे आधी मी फाऊंटनला ठरल्या जागी पोहोचलो, तर त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री कुणाची तरी वाट पाहताना दिसली. तिची नजर झरझर चौफेर फिरत होती. आपल्या हातावरील घड्याळात पाहून मध्येच ती चुचकारत होती.
हीच तर 'रेड चिली' नसावी?
विचारावं का?
नको आणखी काही वेळ वाट पाहू या.
तिच्यापासून चार-पाच पावलांच्या अंतरावर मी उभा राहीलो. या दरम्यान आमच्या दोघांत 'आँखमिचौली' झाली खरी.
काही वेळ असाच गेला. शेवटी धीर करून मी तिच्या जवळ गेलो.
"रेड चिली?" माझ्या तोंडून नक्की शब्द फुटला की नाही? या पेचात मी.
"आपणच का ते....." ती बोलू पाहत होती.
"हो. हो. मीच."
"अहो तासाभरापासून वेड्यासारखी वाट पाहते मी तुमची इथे."
अरेच्चा..! पण भेटीची वेळ तर अकरा वाजताची ठरली होती. जाऊ दे. वेड्यासारखी वाट पाहतेय याअर्थी ही माझ्या प्रेमात 'वेडी' झालेली दिसतेय.
"सॉरी. निघायला थोडा उशीर झाला." मी नमतं घेतलं.
"चला कककककक कॉफी घेऊ या." मी शाहरूखसारखा नेमका 'क' या अक्षरावर अडखळत म्हणालो.
"इथं कॉफी फार छान मिळते, असं ऐकलयं." कॅफे बहारकडे हात दाखवत मी.
"नाही. नको. आधीच उशीर झालाय. टॉमी कुठाय?"
"टॉमी" मी उडालोच. "टॉ मी नव्हेच." माझी कोटी माझ्याच मनात.
"हो. मग काय? त्यालाच न्यायला आलेय ना मी इथे. आठवडाभरापुर्वी आमच्या ह्यांनीच त्याला तुमच्याकडे सोडलं होतं ना.. सईबरोबर खेळण्यासाठी."
"हा टॉमी कोण आहे?"
"हद्दच झाली बाई..! टॉमी. आमचा कुत्रा."
"राँग नंबर आयमीन राँग पर्सन. चुकीच्या माणसाशी बोलताय आपण. टॉमी नावाच्या कोणत्याही कुत्र्याशी माझा परिचय नाही. फक्त गल्लीतली चार कुत्री तेवढी मला ओळखतात... अगदी रात्री-अपरात्रीसुद्धा." कुत्र्यांची माझ्याविषयीची आपुलकी मी स्पष्ट केली.
"ओह..! आय अॅम सॉरी." तिने आपल्या शुभ्र दंतपंक्तींखाली आपली जीभ चावली.
"आय शुड से सॉरी. मीच आधी...."
"पण हा माणूस अला कसा नाही अजून?"
"एक विचारू का? नाही म्हणजे, माझ्या हातात कुत्रा.. सॉरी टॉमी नाही का? तर माझ्या हातात टॉमी नसतानाही तुम्ही मला तो माणूस कसं काय समजलात?" मला संभाषण वाढवायचं होतं.
"अरेच्चा..! हे माझ्या लक्षातच आलं नाही." असं म्हणून तिने पुन्हा आपली जीभ चावली.
या वेगाने हीची जीभ लवकरच तुटून पडण्याची शक्यता अधिक.

"ज्याच्या हाती टॉमी.. त्यालाच पकडा तुम्ही."
"पण एक मात्र वाईट झालं." तिने चेहरा वाईट केला.
"काय ते?"
"मी आपल्यासोबत कॉफी पिण्याची संधी दवडली." यावर आम्ही दोघे एकमेकांना टाळ्या वगैरे देत यथेच्छ हसलो.
नंतर काही वेळात आम्ही दोघांनी एकमेकांचा परिचय करू घेतला. मग काही जुजबी गप्पा चालू असतानाच टॉमीस घेऊन 'तो' माणूस आला आणि टॉमीला तिच्या हाती सोपवून निघूनही गेला. टॉमी नावाच्या कुत्र्याशी माझा परिचय झाला होता. मी त्याला हातात घेऊन गोंजारू लागलो. तोही आपल्या लांबसडक लपलपत्या जीभेने इथे-तिथे माझं अंग चाटून लाळ सांडू लागला. एरवी असला 'लाळ'घोटपणा मी सहन केला नसता. पण आता मी सहन करत होतो ते केवळ आणि केवळ 'टॉमीच्या मालकिणीकरता'...!
इकडे 'टॉमी' मला 'जेरी'स आणत असतानाच पाठीमागून अचानक एका स्त्रीचा आवाज आला.
"व्हाईट टायगर."
हायला म्हणजे 'रेड चिली' आली. ते हिंदी चित्रपटात म्हणतात ना, 'भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही'..!
मी टॉमीसह गर्रकन रेड चिलीकडे वळालो.
पाहतो तर काय..!
समोर साक्षात आमच्या सौ. उभ्या..!!
रेड चिली दूसरी तिसरी कोणी नसून माझी बायकोच आहे, हे कळताच माझ्यातल्या 'व्हाईट टायगर'चा 'टॉमी' होण्यास वेळ लागला नाही.
फिर होगा क्या
क्या पता क्या खबर..!!

Thursday, June 23, 2011
सेल्सगर्ल येता घरा..
नेहमीप्रमाणेच रविवारची आळसावलेली सकाळ.
सौ. मासे आणण्यासाठी बाजारात गेलेली. चिरंजीव रविवारच्या सुट्टीचा जास्तीत जास्त सदूपयोग व्हावा, म्हणून सकाळीच शेजारच्या सोसायटीत क्रिकेट खेळायला गेले होते. मी वर्तमानपत्र जवळजवळ वाचून संपवलं होतं. शेवटी आपला मोर्चा राशीभविष्यकडे वळवला.
हम्म.. काय म्हणतेय माझी रास? मी राशीभविष्याचं पान उघडून त्यातली माझी रास वाचली. त्यातलं हे एक भविष्य...
'आज आपणांस अनपेक्षित धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.'
या राशीभविष्यमध्ये हे नेहमीच असं काहीतरी अपेक्षित नसलेलं वाचायला मिळतं.
वर्तमानपत्र टिपॉयवर ठेवून मी जवळचा रिमोट उचलून टिव्ही चालू केला तोच दारावरची डोअरबेल वाजली. सौ आली की काय? नाही... सौ लगेच कशी येईल? तिला बाजारात एक वस्तू घ्यायला किमान अर्धा तास तरी लागतो, हे मी चागलचं जाणून होतो. मागे एकदा हीने स्वत:ला एक साडी खरेदी करण्यासाठी मला तब्बल १७ दूकाने हिंडवली होती. खेळ सोडून चिरंजीव परतणं शक्य नव्हतं.
टिव्हीवर विषेश काही नव्हतं म्हणून मी टिव्ही बंद करून मी दरवाज्याकडे वळलो. दरवाजा उघडला.
आणि पाहतो तर काय..
दारात एक सुंदर तरूणी उभी..! पंजाबी की काय म्हणतात? तो ड्रेस घातला होता. उंच टाचांच्या सँडल. खांद्यापर्यंत रूळणारे मोकळे केस, 'वेणी' वगैरे प्रकारच तिला माहीत नसावा बहूधा. खांद्याला पर्स लटकलेली होती आणि चेहर्यावर मंद स्मित.. पण उगाच उधारीचं वाटावं असं.
"बोला..!" मी अजुनही तिचा देखणा चेहरा पाहण्यात दंग होतो.
"आपण मिस्टर *** *** ना? " तिने माझं संपुर्ण नाव घेतलं.
हायला म्हणजे ही मला ओळखते..! याला मी माझं नशीब म्हणू की तिचं आंतरज्ञान..! माझ्या नावानिशी आणि आता याक्षणी माझ्या घरी आलीय त्याअर्थी पत्त्यानिशी मला ओळखणारी ही बया कोण?
मी आठवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागलो. कुठे बरं पाहीलयं हिला? कधी भेटली होती मला ही किंवा मी तिला?
छे..! मी हीला पाहील्याचं किंवा भेटल्याचं अजिबात आठवत नाही. पण एक मात्र नक्की.. मी हीला या जन्मीच काय? मागल्या जन्मीही कधी पाहीलेलं किंवा भेटलेलो नसेन.
"सॉरी..! मी आपल्याला ओळखलेलं नाही." मी भुवया किंचित उंचावत म्हणालो.
"मीसुद्धा तुम्हांला ओळखत नाही." तिने माझचं वाक्य पुन्हा माझ्यावरच फेकलं.
"मग माझं नाव आपल्याला कसं माहीत?" मी वकीली थाटात सवाल केला. माझ्या भुवया अजूनही खाली यायला तयार नव्हत्या.
"तुमच्या दारावरच्या नेमप्लेटवरून कळालं." तिने गौप्यस्फोट की काय म्हणतात? तो केला आणि हे नावाचं गुढ माझ्या लक्षात आल्यावर आम्ही दोघेही हास्यरसात बुडालो.
"पण तुमचं माझ्याकडे काय काम होतं?" आमचं हसणं थांबल्यावर मी विचारलं.
"मी सेल्सगर्ल आहे." ती आपल्या गालाशी जवळीक करणार्या बटा कानामागे सारीत बोलली. इकडे तिच्या प्रत्येक अदांनी मी घायाळ होत चाललो होतो.
"पण फेरीवाले आणि सेल्समन यांना प्रवेश नाहीए आमच्या सोसायटीत. गेटवर तसा फलकदेखील लावलेला आहे. तुम्ही वाचला नाहीत का?" मी तिच्यावर उगाचच डाफरलो.
"हो वाचला. पण त्यात लिहलयं, सेल्समनना प्रवेश नाही. मी तर सेल्सगर्ल आहे." तिने पळवाट आधीच शोधली असावी.
"आम्हांला काहीही नकोय." मी संधी दवडीत होतो की काय?
"प्लीज, फक्त पाचच मिनिटे घेणार आहे मी तुमची." ती चेहरा पाडून म्हणाली.
"ठीक आहे." मी तिच्या अजीजीच्या स्वराला भुललो होतो. "पण माझी पत्नी घरी नाहीए. मी घरी एकटाच आहे." मी तिला शक्ती कपूर कृत गैरवर्तनाची भीती दाखवून तिच्या चेहर्यावरचे भाव निरखू लागलो.
"हरकत नाही. मी तुम्हाला सांगेन आमच्या कंपनीची स्कीम." तिच्या चेहर्यावर भीतीचा लवलेशही नव्हता.
"या तर मग आत."
माझ्या चेहर्यावर 'मी सभ्य वगैरे आहे' असलं काहीतरी लिहलं असावं की काय? ती माझ्याबरोबर घरात यायला तयार झाली.
"बसा." मी सोफ्याकडे हात दाखवून म्हणालो.
मी एकवार स्वत:कडे पाहीलं. अंगात एखाद-दूसरं भोक असलेली बनियन आणि पायात रेघोटेवाला लेंगा.
इतक्या सुंदर तरूणीसोबत पाच मिनिटे का होईना बोलण्याची संधी मिळतेय, तर मी हा अशा अवतारात..!
"दोन मिनिटं थांबा. मी हा आलोच." असं म्हणून मी आत कपडे बदलण्यासाठी गेलो.
कपडे बदलून आलो तेव्हा ती घर पाहण्यात मग्न झालेली दिसली. माझ्या लक्षात आलं, ती सोफ्यावर न बसता भिंतीलगतची खुर्ची घेवून त्यावर बसली होती. 'सोफा' नाकारून तिने माझा मार्ग 'अवघड' केला होता.
अशा वेळी काय करायचं? हे मला पक्याने सांगितलेलं असल्यामुळे मी मुद्दाम खाकरलो. तिने एकदम दचकून माझ्याकडे पाहीलं आणि पुन्हा मघासारखं मंद स्मित केलं.
"ती ट्रॉफी..." ती कोपर्यातल्या टेबलावरील ट्रॉफीकडे बोट दाखवत म्हणाली.
"मी एक लेखक आहे. माझे अनेक लेख मासिकांतून नियमित प्रकाशित होत असतात. दिवाळी अंकासाठी तर प्रकाशक...." मी बोलू पाहत होतो.
"अच्छा. तुमच्या लेखाला मिळालीय होय." माझं बोलणं अर्धवट तोडून तिने मध्येच तोंड घातलं.
"माझ्या लेखाला नाही. माझ्या लेकाला मिळालीय." मी 'लेकाला' शब्दावर जोर देत कोटी केली.
"लेकाला?" तिला 'कोटी' कळाली नाही.
"लेकाला म्हणजे माझ्या मुलाला. शाळेत झालेल्या थाळीफेक स्पर्धेत त्याचा पहीला नंबर आला होता, तेव्हा मिळाली होती त्याला ती ट्रॉफी."
मी हे सगळं अर्थात थाळीसारखचं 'फेकल' होतं.
कसली थाळीफेक अन कसलं काय..! घरी फक्त जेवणातला एखादा पदार्थ आवडला नाही, तरच चिरंजीव थाळीफेक करतात. हे हीला सांगून काय करणार..!
वास्तविक ती ट्रॉफी आमच्या सौ. ला सोसायटीतल्या पाककला स्पर्धेत लाभली होती. स्पर्धेत तिने 'कार्ल्याचे गुलाबजामून' की काय? असलाच कायतरी भयानक पदार्थ बनवला होता.
"स्कीम काय आहे?" मी मुख्य विषयाला हात घातला.
"आमच्या कंपनीकडून आपल्याला ३० रूपयाचं एक कुपन विकत घ्यावं लागेल. ते आपण स्क्रॅच करायचं आहे. स्क्रॅच केल्यावर आपल्याला या वस्तूंपैकी सोडत पद्धतीने एखादी वस्तू लागेल." तीने मला एक कागद दिला. त्यावर टिव्ही, डीव्हीडी प्लेअर, मोबाईल, मिक्सर, रिस्टवॉच इ. इलेक्ट्रॉनिक उपकरणे फोटोंसहीत दिसत होती. "तर ती वस्तू आपण केवळ १५०० रूपये भरून आमच्या दूकानातून प्राप्त करू शकता." तिने एका दमात स्कीम समजावून सांगितली.
मला वाटलं, 'चष्मेबद्दूर' चित्रपटातल्या दिप्ती नवलसारखी हीसुद्धा मला अर्धा बकेट पाणी आणि एक मळलेला टॉवेल आणायला सांगून त्यात डिटर्जंट पावडर टाकेल. मग त्या पाण्याला फेस आणण्यासाठी आम्ही दोघे त्या बकेटमध्ये हात घालून ते पाणी हलवून फेस निर्माण करू. तिच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला होईल आणि आम्ही दोघे एका सुरात म्हणू...
"कपडों की धुलाई के लिए किफायती साबून..... 'चमको'
बार बार लगातार ..... 'चमको'
कपडों को चकाचौंध करे. खुशबूदार, झागवाला.... 'चमको'...!"
पण इथं हा प्रकारच नव्हता. मग स्पर्श वगैरे ही गोष्ट तर दूरच.
"मग घेताय ना कुपन?" तिनं असं म्हटलं तेव्हा माझी तंद्री भंग पावली.
"अं..! हो..! घेतोय ना. घेतोय." मी हे प्रत्यक्ष आणि "न घेऊन सांगतोय कुणाला?" हे स्वगत म्हणालो.
मी खिशातून दहाच्या ३ नोटा काढून तिच्यासमोर धरल्या. तिने नोटा घेण्यासाठी आपला हात पुढे केला.
आणि अचानक...
४४० की ८८० इतक्या व्होल्टचा वीजेसारखा एक लोळ सबंध अंगभर धावू लागला. म्हणजे मला तरी तसं जाणवलं. तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श माझ्या हाताला झाला होता. मी नकळत की जाणून-बुजून माहीत नाही, माझ्या स्पर्श झालेल्या हाताला ओठांजवळ नेवून त्याचं हलकेच चुंबन घेतलं. हायला..! हा असला रोमॅन्टिकपणा माझ्यात आहे..! याची मला यापुर्वी कल्पनादेखील नव्हती.
तो स्पर्श आता आपण जीवापाड जपायचा. अगदी अंघोळ करतानादेखील त्या हाताला प्लास्टीक गुंडाळल्याखेरीज अजिबात अंगावर पाणी घ्यायचं नाही, असा मी निर्णयदेखील घेवून टाकला.
तिने पर्समधून काढून दिलेलं कुपन मी स्क्रॅच केलं. मोबाईल लागला होता.
"सर, सात दिवसांच्या आत आपण आमच्या दूकानात प्रत्यक्ष येवून मोबाईल घेवून जा. आणखी काही कुपन्स घेणार आहात का?"
"नाही. नको. पुरे."
"धन्यवाद सर. आपण आपला अमुल्य वेळ मला दिल्याबद्दल." ती औपचारीकपणे म्हणाली.
"मला तुम्हांला काही विचारायचयं. म्हणजे काये... मी एक लेखक आहे. त्यामुळे मला तुमच्या या कामासंदर्भात काही जाणून घ्यायचयं. मागे मी सिग्नलवर मासिके विकणार्या एका मुलाशी गप्पा मारून त्यावर एक कथा लिहून प्रकाशकाकडे पाठवून दिली होती. प्रकाशकाने कथा पसंत नाही, म्हणून तार केली होती. सोबत कथा गहाळ झाल्याचही कळवलं होतं. मग काही महीन्यांनी मधूर भांडारकरचा 'ट्राफीक सिग्नल' चित्रपट पाहण्यात आला आणि मला माझी कथा कुठे गहाळ झाली याचं उत्तर मिळालं." यावर तिच्या चेहर्यावर माझ्याविषयी एक आदरयुक्त भीती निर्माण झाली.
यानंतर आम्ही दोघे बराच वेळ तिच्या 'करीयर'बद्द्ल बोलत होतो. मी काही मुद्दे माझ्या टाचणवहीत लिहीत होतो.
शेवटी ती जाण्यासाठी उठली. दोन पावले गेली असेल तोच तिच्या लक्षात आलं की, तिची ओढणी कशात तरी अडकलीय. तिने मागे वळून माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले. मी तडक खुर्चीकडे झेप घेतली.
आणि पाहतो तर काय....
तिची ओढणी आमच्या चिरंजीवाने चघळून खुर्चीला लावलेल्या च्युईंगमला चिकटली होती.
चिरंजीवांचं हे च्युईंगमप्रेम मला नवीन नव्हते. मागे त्याने झोपण्याआधी माझ्या उशीला च्युईंगम लावून ठेवला होता. दूसर्या दिवशी मला माझ्या केसांची आहूती द्यावी लागली होती.
पण यावेळी च्युईंगमने आपली 'कमाल' दाखवून 'किमान' मला तरी एक सुवर्णसंधी दिली होती.
मी तिच्या ओढणीची च्युईंगमपासून सुटका करू लागलो तोच दारात साक्षात मासे घेवून परतलेल्या सौ. ची एन्ट्री झाली आणि टिपीकल हिंदी सिनेमात खपेल, असा सीन पाहून सौ. च्या कपाळावरील शीरा ताडताड उडू लागल्या. माझी अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती. सकाळी वाचलेल्या राशीभविष्यातील त्या भविष्याचा प्रत्यय मला आता आला होता. 'अनपेक्षित धक्का'... खरं झालं बाबा..!
सौ. ने आपला बाणा दाखवून सेल्सगर्लला घरातून पिटाळून लावले. मी आंतरज्ञानाने जाणले, मासे काय आज तव्यात लोळणार नाहीत.
ही गोष्ट सबंध सोसायटीत पसरायला फार वेळ लागला नाही. मग आमच्या घरी सोसायटीतल्या रिकामटेकड्यांचा राबता सुरू झाला.
"नशीबवान आहेस लेका..!" इति परांजपे.
आत काय काय केलसं रे? याची मला खोदून खोदून विचारणा होऊ लागली. मी घडलेला एक एक प्रसंग मीठमसाला लावून त्यांना सांगत होतो. सगळे आंबटशौकीन माझा हेवा करीत होते.
शेजारच्या कुळकर्ण्यांनी मात्र मला लांबलचक भाषणच दिलं. 'तुम्हांला हे असलं वागणं शोभतं का? आपल्याला एक पत्नी आहे... एक मुलगा आहे.. याचा विचार.... इ. इ.
वास्तविक त्यांच्या या रागामागे असलेला छूपा हेतू मी जाणून होतो. तो हेतू हा होता... १०१ नंबरचं रूम सोडून ती सेल्सगर्ल १०२ मध्ये (१०२ हा माझ्या रूमचा क्रमांक.) गेलीच कशी?
ही घटना (माझ्यासाठी मात्र दूर्घटना) घडल्याच्या दूसर्याच दिवशी सोसायटीतल्या सबंध बायकांनी सोसायटीच्या ऑफीससमोर मोर्चा काढला. त्यांची मागणी होती.. सोसायटीच्या गेटवर लावलेल्या फलकात 'सेल्सगर्ल' हा शब्द समाविष्ट व्हावा.
काही दिवसांत बदललेल्या सुचनेनुसार गेटवर फलक झलकू लागला...
फेरीवाले, सेल्समन आणि सेल्सगर्ल यांना प्रवेश नाही.
यातला सेल्सगर्ल हा शब्द 'बोल्ड' का केला होता?
हम्म.. सेल्सगर्ल असतातच 'बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल.' पेंटरने तो शब्द बोल्ड ठेवण्यामागे हीच 'भावना' असावी बहूधा..!

Friday, June 10, 2011
'पाय'चीत.
"अरे काय करून घेतलसं हे?" वसंत ऊर्फ वश्या गोपाळसह धावत येवून माझ्या कॉटवरील उरलेल्या जागेवर बसून धापा टाकीत म्हणाला. गोपाळनेही मुंबईमधील लोकलच्या सवयीनुसार सराईतपणे जागा पटकावली.
मी केविळवाण्या नजरेने एकवार आपल्या पायाकडे पाहीले. एका उंचशा स्टँडला 'टांग'लेला माझा बँडेजधारक पाय गरम चहातून बुडवून काढलेल्या ब्रेडसारखा सुजल्यामुळे मला तो सफेद हत्तीच्या पायासारखा भासू लागला. लोकं मला 'पांढर्या पायाचा' तर म्हणणार नाहीत ना? या चिंतेत असतानाच माझ्या उजवीकडून कारूण्यमय हुंदका माझ्या कानी आला. या आमच्या सौ होत्या.
"अहो आहे म्हटलं मी अजून..!" का कुणास ठावूक? माझ्या या टोमणेवजा विधानानंतर सौ. नी तडक 'काळी पाच' पकडली. तेव्हा इतर कॉटांवरील पेशंट्सनी उगाचच सुतकी चेहरे केले.

वास्तविक सौ. ना मनातून आनंद झाला असावा, असा माझा निकष आहे.
'आता कसे माझ्या प्रत्येक गोष्टीत टांग अडवता तेच पाहते..!' असे म्हणताना कमरेत पदर खोचणारी सौ माझ्या डोळ्यासमोर आली.
"आवरा. वहीनी आवरा. पैर सलामत तो जुते पचास..!" गोपाळ या गृहस्थाला प्रसंगातलं गांभीर्य अजिबात कळत नाही. माझा पाय याक्षणी जर 'सलामत' असता, तर गोपाळच्या ढुंगणालाच 'सलाम' केला असता.
"अरे पण तुझ्या पायांना हा हॉस्पीटलचा रस्ता सापडलाच कसा?" वश्यापण कधीकधी ही असली शाब्दीक कसरत करतो.
"मला का हौस आहे इथं येण्याची..! खड्डा..." मी पायाची दुर्दशा होण्याची घटना सांगणार तोच..
"काही विचारू नकोस रे बाबा..! मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बघितले की, हेच कळत नाही... रस्त्यांत खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते. इतके खड्डे चंद्रावरपण नसतील बायगॉड..!" या स्वत:च्याच विनोदावर गोपाळ गालावर कृष्णविवराइतके खड्डे पाडून मनसोक्त हसला, त्यावेळी माझी कॉट धरणीकंप झाल्यासारखी हलत होती.
लोकं 'खड्यात गेलास' असं का म्हणत असावेत? ते मला तेव्हा कळलं.
"खड्डा..." मी टेपरेकॉर्डरमध्ये कॅसेट अडकल्यासारखा या एकाच शब्दावर अडकलो. ठणठण गोपाळ पुन्हा ठणाणा करू लागला.
"खड्ड्यावरून आठवलं. मागच्या पावसाळ्यात आमचे निरंजनकाका असेच रस्त्याने चालले होते. रस्ता केवळ एवढ्यासाठीच म्हणायचा कारण, महानगरपालिकेने रस्त्याच्या तोंडाशी अमुक अमुक मार्ग असा फलक लावला होता म्हणून. मुळात त्या रस्त्यावर प्रदर्शनाला मांडल्यासारखे असंख्य खड्डे आपली 'खोली' बाळगून होते. आता अशा भररस्त्यात काका अचानक गायब..! गुरूत्वाकर्षणाचा नियम खड्ड्यांत टाकून ते वर जाणे तर अशक्यच. मग गेले कुठे? असा विचार करत असताना 'खड्ड्यातच गेले असावेत' असा तर्क करून आमच्या सोसायटीने महानगरपालीकेवर खड्डे बुजवण्यासाठी मोर्चा नेला. आणि काय आश्चर्य पहा..! दोनच दिवसांत खड्डे बुजून रस्ता अगदी गुळगुळीत झाला, पण गुळगुळीत टक्कल असलेले आमचे काका मात्र 'गूळ' आयमीन गूल झाले. तिसर्या दिवशी काका स्वगृही परतले असता त्यांनी सांगितले, की ते गटाराचं झाकण उघडं असल्यामुळे त्यात पडले होते." गोपाळने 'पंचतंत्रा'मधली एखादी गोष्ट सांगावी, अशा रितीने तो प्रसंग कथन केला. तो प्रसंग ऐकत असताना आमच्या सौ. चे रडू पळून जावून चेहर्यावरचे भाव सेन्सेक्समधील चढ-उतारासारखे भरभर बदलत होते.
"आणि कहर म्हणजे ज्या दिवशी काका गटारात पडले, त्या दिवशी गटारी अमावास्या होती." यावर मी व वश्या हसलो, पण गोपाळच्या चेहर्यावर ऑपरेशन थिएटरमधून गुंतागुंतीचं ऑपरेशन करून बाहेर आलेल्या डॉक्टरासारखी गंभीरता होती.
"माझाही पाय खड्ड्यातच मुरगाळला." मी एवढं म्हणेपर्यंत इकडे सौ. ने आपल्या डोळ्यांना पदर लावलादेखील. माझा पाय बरा होईपर्यंत सौ. च्या डोळ्यांतील अश्रू संपून नुसत्याच कवड्या शिल्लक राहतील की काय? अशी शंका येवून माझेही डोळे जरासे पानावले.
"तुझा पाय काल मुरगाळला ना?" गोपाळच्या प्रश्नाचा रोख मला कळला होता. तो आता ग्रहांसोबत खो-खो खेळत होता.
"ए गप रे..! काल अमावास्या होती, पण ती दूपारी २ वाजताच संपली. आणि याचा पाय ऑफीस सुटल्यावर म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास मुरगाळला." वश्याने गोपाळलाच खो दिला.
"रस्त्यातले उंचवटे बघताना खड्ड्यांकडे दूर्लक्ष व्हायचेच." 'उंचवटे' या शब्दावर जोर देत गोपाळने मला खराखूरा कोपर मारत ही 'कोपरखळी' मारली.
तरी बरं सौ. ला ही असली 'अलंकारीक' भाषा कळत नाही म्हणून.
मी गोपाळला एक चिमटा काढला. चिमट्याची भाषा त्याला कळत असावी, त्याने विषय बदलला.
"किती सुजलाय रे पाय..!" गोपाळ माझ्या सुजलेल्या पायाकडे पाहून म्हणाला.
"हम्म..!" असं म्हणून वश्याने नुसतीच मान हलवली.
"आता मला कळलं, हिंदीत पायाला 'पाव' का म्हणतात ते..!" इति गोपाळ.
"उगाच पुलंची कोटी आपल्या नावावार खपवू नकोस." मी त्याच्या विनोदातली हवाच काढली.
आणखी बराच वेळ आमच्या अशा गप्पा रंगल्या. मग सौ. वगळता दोघांनी काढता 'पाय' घेतला.
*
दोन-चार दिवसांतच मी इस्पितळातळातून डिस्चार्ज घेवून घरी आलो. माझे दोनाचे चार पाय झाले होते. हाती कुबड्या आल्या होत्या. कुबड्यांच्या आधारे आता मी घर फीरत होतो. अन्यथा सोफ्यावर बसून दिवसभर एकाच मासिकाची असंख्य पारायणे करीत होतो.
कधी एफ. एम लावलाच तर...
'आज कल पाँव जमीन पर नही पडते मेरे..'
चॅनल बदलला तरी..
'पप्पू कान्ट डान्स साला. पप्पू नाच नही सकता..'
ही असली गाणी माझ्या अपंगत्वाची खिल्ली उडवत होते.
त्यादिवशी असाच पेपर वाचत बसलो होतो, तोच हॉलमधून सौ. चे काही शब्द कानावर आले.
ती मुलाला सांगत होती,"त्याचा पाय मोड. त्याचा पाय मोड."
माझ्या छातीत धडकीच भरली. दूसरा पाय सुजलेल्या पायासह थरथर कापू लागला. म्हणजे सौ. माझ्या पायावर उठलीय. तीला मला कायमचं घरीच बसवून ठेवायचयं. गोगलगायसारखे पाय पोटात घेता आले असते, तर किती बरं झालं असतं, असला काल्पनिक विचार करत मी कुबड्या घेवून हॉलमधे गेलो.
पाहतो तर काय...
सौ मुलाला जोडाक्षरे कशी काढावीत? हे शिकवीत होती. साहजिकच जोडाक्षरे काढताना त्या शब्दांतल्या कुठल्यातरी अक्षराचा 'पाय मोडावाच' लागतो.
हुश्श..! म्हणून मी सुटकेचा निश्वास सोडला.
*
परवा आमच्या ऑफीसातील 'सुंदर' रिसेप्शनिस्ट रोमा मला (सुजलेल्या पायांसकट) पाहायला आली. माझ्या रोमरोमावर रोमांच उभे राहीले. सौ. घरी नव्हती. मुलाच्या हातावर काही नाणी डकवून त्याला बाहेर पिटाळले.
"सर, पक्या सांगत होता की, तुम्ही कोमात आहात म्हणून.." रोमा आपला मेकअप केलेला चेहरा उगाचच वाईट्ट करून म्हणाली.
मी पक्याचे मनात आभार मानले. एरवी त्याचं असं खोटं बोलणं मी खपवून घेतलं नसतं.
पाय बरा झाल्यावर ऑफीसात जाईन, तेव्हा पक्याला ऑफीससमोरच्या उडप्याच्या हॉटेलात भजी-चहा नक्की चारेन, असा निश्चय मी तेव्हाच करून टाकला.
"इतकं काही नाही. फक्त पाय मुरगाळलाय." मी पायाला ठेच लागली असावी, इतक्या सहजतेने म्हणालो.
"ओह..!" हे म्हणताना तिच्या लिपस्टीकने रंगलेल्या नाजूक ओठांचा झालेला चुंबनासारखा आकार पाहून मी घायाळ झालो.
"फार दुखतयं का?" तिने माझ्या सुजलेल्या पायावर आपल्या कोमल हातांची बोटे फिरवित विचारले.
"दर्द वहाँ नही. दर्द तो यहाँ है. दिल में.." यश चोप्रांच्या चित्रपटातील नायकाप्रमाणे मी हे वाक्य म्हटले पण अर्थात मनात.
"नाही.. तुझा स्पर्श झाला नि माझं निम्मं दुखणं पळालं." मी शेवटी धाडस करून म्हणालोच.
"काही म्हणालात" ती.
बोंबला..! म्हणजे हीने काही ऐकलच नाही.
"वहीनी कुठं दिसत नाहीत त्या?"
"ती बाजारात गेलीय. तू बैस ना." ती सोफ्यावर माझ्यापासून दोन ध्रुवांइतकं अंतर ठेवून बसली.
काही वेळ असाच गेला.
"रोमा, जरा मला आधार देशील त्या कोपर्यातल्या टेबलापर्यंत जाण्यासाठी." मी कुबड्या बेडरूमध्येच विसरलोय, हे लक्षात येताच माझ्या अपंगत्वाचा फायदा घ्यायचे ठरवले.
"कशाला? काही हवयं का आपल्याला?"
"तिथे एक मासिक आहे. ते हवं होतं."
"मग तुम्ही कशाला त्रास घेताय? मी आहे ना. थांबा, मी देते." असं म्हणून तीने त्या टेबलावरील मासिक आणून माझ्या हाती दिले.
ज्या अर्थी मासिक मागून घेतलयं, त्याअर्थी ते वाचणं क्रमप्राप्त होतं. मी मधलं कुठलंतरी पान उघडून नुसताच वाचण्याचा अभिनय करू लागलो.
आता काय करायचं? तिच्या एका स्पर्शासाठी मी आतूर झालो होतो.
हां..! माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.
चहा करायला सांगू या. म्हणजे काय होईल? साखर आणि चहापावडरचा डबा कुठे आहे? ते सांगण्याच्या निमित्ताने ती मला स्वयंपाकघरापर्यंत नेण्यासाठी आधार देईल.
"रोमा, थांब मी तुझ्यासाठी चहा टाकतो." उभं राहण्याची व्यर्थ धडपड करत मी.
"तुम्हांला सांगितलं ना त्रास घेवू नका म्हणून. मला नकोय चहा."
"असं कसं..! तू काय रोज येणारेस होय आमच्या घरी?" मी हट्टाला पेटलो होतो.
"बरं. पण चहा मी करणार." हे ऐकून जंगली चित्रपटातील शम्मी कपूरसारखी 'याहू' म्हणून उडी मारण्याचे माझ्या मनी आले.
"चल मी तुला साखर आणि चहापावडरचे डबे दाखवतो."
मी तिच्या खांद्यावर हात टाकून लंगडत लंगडत स्वयंपाकघराकडे जाऊ लागलो. असं वाटतं होतं, स्वयंपाकघर पार काश्मिरपर्यंत असतं तर काय बहार होती..!
आणि अचानक...
पौराणिक हिंदी मालिकेत जसे राक्षस अचानक कुठेही कुठल्याही रूपात प्रकट होतात, तशा सौ. दारात प्रकट झाल्या. माझं सारं अवसान गळून पडलं.
रोमा आणि माझ्यातलं हे दृश्य पाहून सौ भलत्याच चेकाळल्या होत्या, हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नव्हती. तीचा चेहराच बोलत होता.
"पाय घसरलाच ना शेवटी..!" सौ. माझ्यावरच घसरल्या.
नंतर तीने माहेरून आंदण मिळालेल्या ठेवणीतल्या सटवी, नटवी या आणि अशा सारख्या शिव्या देवून रोमाला घरातून हाकलवून लावले. झिंज्या उपटणंच तेवढं बाकी होतं.
आणि शेवटी स्वत:च्या कपाळावर हात मारत बराच वेळ आपल्या नशिबाला दोष देत बसली होती. त्या घटनेनंतर सौ. ने माझ्याशी काही दिवसांपुरता अबोला धरला.
*
दिवस औषधपाणी घेत, पायाचे व्यायाम करत जात होते. पायांत सुधारणा होत होती.
एके दिवशी मी कुबड्या न घेता आपल्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न केला.
आणि काय आश्चर्य..! मी उभा राहीलो. माझा आनंद गगनात मावेना. कधी एकदा जावून सौ. ला सांगतो, असे झाले.
मी जमेल त्या वेगाने पळतच स्वयंपाकघराकडे धाव घेतली. आणि..
पायाखालची जमीन सरकावी, तसा मी धाडकन फरशीवर पडलो. सौ. ने फरशी धुण्यासाठी फरशीवर कपडे धुण्याच्या पावडरीचं फेसाळ पाणी टाकलं होतं. माझा बरा झालेला पाय पुन्हा दुखावला.
काय झालं? पाहण्यासाठी सौ. स्वयंपाकघरातून लगबगीने बाहेर आली. द्रव पदार्थावर पडलेला माझा स्थायूरूपी मांसल गोळा पाहून तीने आपली जीभ चावली.
माझा चेहरा ९९ धावांवर 'पाय'चीत झालेल्या खेळाडूसारखा झाला होता.

Subscribe to:
Posts (Atom)