Showing posts with label विडंबने. Show all posts
Showing posts with label विडंबने. Show all posts

Thursday, July 16, 2026

नाभिका रे (विडंबन)

नाभिका रे, गर्दी आहे रे
प्रेमानं काप जरा आज नाक रे
अंघोळीचे पाणी आता, झाले पूर्ण गार रे

'सकाळ' वाचूनी झाला, माझ्यामागचा अस्वल भादरून झाला
माझ्या भावा, माझा नंबर येऊनी गेला
घाई कर गड्या.. बघ त्याने, वर केली काख रे

जुने वस्त्र पांघरूनी, पाणी फस्स फवारून, मज पामराला
विमलही मुखामंदी कोंबूनी आला
चालते रे मग कैची अशी, नसे तिला धाक रे

*

मूळ गीत : नाविका रे, वारा वाहे रे

Thursday, December 14, 2023

मणक्यांची माळ दुखे अजुनि कंबरेत (विडंबन)

मणक्यांची माळ दुखे अजुनि कंबरेत
शेक घेऊनी वरती बाम लावलेत

कोळूनी तू पी युट्युब, थंबनेल त्यांचे
डोळ्यांदेखत पळे दुखणे पामराचे
मणक्यांस फरक पडतो शून्य मिनिटांत

त्यासाठी तापवुनी नारळाचं तेल
मोहरीलाच तडकावूनी, पाठीवरी चोळ
रिमझिमते औषध हे जलद चादरीत

हातांसह बोटांनी पाठ चेपताना
बरगड्यांची मुक्त हाडे मिळुनि मोजताना
आवंढ्यापरी येतसे फुफ्फुस सरकुनी गळ्यात

तू गेलिस चोळुनी ते मूव (Moov) रागे रागे
घरघरणे पंख्याचे फक्त उरे मागे
होते ही चिडचिड का कधी तुझ्या घरात?

* * *

मूळ गीत : https://www.aathavanitli-gani.com/Song/Bagalyanchi_Maal_Phule

Monday, January 12, 2015

सखे आता हे फार जाहले

आज चालणे उन्हात पडले, तुझ्यामुळे
डोळ्यांपुढे अंधार दाटले, तुझ्यामुळे !

घाम शर्टही भिजवत होते
तुझे इरादे बुलंद होते
मँगोला तीन-चार जाहले, तुझ्यामुळे !

"दत्तमंदीर" जनांस पुसले
प्रत्येकाचे तर्क निराळे
आत्याचे तुझ्या घर लांबले, तुझ्यामुळे !

कडेत माझ्या होती वीणा
बंडू उधळे दाही दिशांना
विंचवाचे बिर्‍हाड लाजले, तुझ्यामुळे !

घर दिसले नि आली स्फुर्ती
कुलूप होते, आत्या नव्हती
सखे आता हे फार जाहले, तुझ्यामुळे !

* * *

Thursday, June 12, 2014

मळलेले गाउन माझे..!

मळलेले गाउन माझे साबणाने तू धुवावे
मोकळ्या गच्चीत नेऊनी तयाला वाळवावे

जाऊनी पुढल्या सुट्टीत खरेदी इतकी करू की,
राजसा, घेऊनी पिशव्या माझिया मागे फिरावे

लाडक्या मालिका माझ्या, पाहू दे मजला सुखाने
यायला घरी तुजला ऑफीसातूनी लेट व्हावे

रे ! तुला भल्या पहाटे गजराने जाग यावी
तू मला चहा करावा अन् पाणी तापवावे

* * *

Wednesday, March 14, 2012

लाटणे रिटर्न्स ! (भांडणात पडताना)

भांडणात पडताना तुझा धरला मी हात !
सखये गं आवर ही लाटण्याची नको बात !

भरलेल्या लोकलला आलो मी लटकून
चार जिने चढल्यावर गेलो पुरता थकून
त्या तिथल्या म्हणे आणा वाण्याकडून अंडी सात !

सांग कसे चावू मी लाडू हे मोतीचुर
शेजारील बघ काका झाले किती चतूर
डाळ इतकी पातळ नि शिजला नाही कधी भात !

मुळ गीत इथे पहा.

* * *

Tuesday, October 11, 2011

बायको घरात जंग छेडते खरी.

(चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी )

बायको घरात जंग छेडते खरी
सैनिका जरा जपून जा तुझ्या घरी !

ऑफीसातूनी येता चहा टाकते
घोट घेता त्याचा, विष बरे वाटते
बद्धकोष्ट नाही तरी, उगाच छळते
कॅन्टीनातला चहा बेश्ट त्यापरी !

सुप बनवून असा डाव साधला
पाटणकरांचा काढा नसे वेगळा
वाईट करून तोंड, गप्प ढोसला
सोसतो हिला, प्राण आहे तोवरी !

काल शेजारिणीला काय पाहीले !
खिडकीस आज नवे पडदे लागले
लाटण्याने बिनचुक कपाळ भेदले
सुजले कपाळ, लेप लाव त्यावरी !

* * *

Tuesday, September 20, 2011

सख्खे शेजारिणी..!

सख्खे शेजारिणी तू हसत रहा
दात पिवळे दावीत रहा

तीव्र तिरळे पाहून डोळे
भाव निराळे त्यातून कळले
डोळ्यांतूनि तव बुब्बुळ खेळे
तू नजर तुझी झुकवून पहा

सहज विकट तू हसता वळूनी
दोर अंगणी धरि त्वरे मी तोलूनी
समज मनीचा जाय उधळूनी
तू दात स्वच्छ तरी घाशीत रहा

उभी जेव्हा खिडकीत होतसे
खिडकीमागील होई दिसेनासे
स्विमिंगपुलासही पूर येतसे
नित्य कोसभर धावून पहा

मुळ गीत इथे पहा.

* * *

Monday, September 12, 2011

जेव्हा तुझ्या कटांना.

जेव्हा तुझ्या कटांना उधळी हुशार नवरा
माझा न राहिलो मी हरवून हा निवारा

परात ढाल होते, हाती लाटणे घेशी
बदलून टाकते ही चेहर्‍यावरील नक्षी
दातांस मालकीच्या नाही मुखात थारा

चोरून अंग घेतो, नेम हा तरी चुकेना
ही वेळ वाचण्याची कळते तरी वळेना
देशील का कधी तू थोडा तरी सहारा ?

कुत्र्यांस ह्या गल्लीच्या का सांग त्रास होतो
लांबून भोजनाचा नुसताच वास घेतो
केव्हा या मस्तकीचा उतरेल सांग पारा ?


मुळ गीत इथे पहा.

* * *

Tuesday, August 16, 2011

तरूण आहे मात्र अजुनी..!

तरूण आहे मात्र अजूनी, राजसा विटलास का रे?
एवढ्यातच त्या घुशीवर तू असा भाळलास का रे?

अजूनही जाहले ना नयनी मोतीबिंदूही विशाला
अजून मी पडले कुठे रे? हाय! तू चिडलास का रे?

सांग, ह्या शेजारणीच्या कारट्याला काय सांगू?
सटकले लाटणे माझे.. आणि तू सुजलास का रे?

बघ मला पुसतोच आहे संशयी समाज सारा
कामवालीच्या शीलाचा भंग तू केलास का रे?

उसळती पोटात तुझीया हरभर्‍याच्या मंद लाटा
तू पचवाया अताशा भोजने शिकलास का रे?

कपाळ फुटलेले का रे? डोळे ही लालबुंद का रे?
बोल, पिऊनी त्या गटारी तू असा पडलास का रे?


मुळ गीत इथे पहा.

* * *

Friday, August 12, 2011

पहाटे पहाटे मला झोप आली.

पहाटे पहाटे मला झोप आली
कशी ढेकणांची दिशाभूल झाली?

मलाही कळेना, तूलाही कळेना
कसे चिरडावे मुठी ढेकणांना
भिंतीस आली पुरेशी न लाली

चल झोपूया, रहा जागे कशाला?
सुरू जाहल्या हालचाली उशाला
अशी का घडावी पुन्हा रात्रपाळी

कसा वाचवू रक्त माझ्या शरीरा
रिता सर्व झाला कळाले उशिरा
असे चुंबिले तू मला भोवताली

तुला आण शाकाहारी पुर्वजांची
तुला आण बदललेल्या कुसांची
तुझ्या जिंकण्याची मला कीव आली


मुळ गीत इथे पहा.

* * *

Tuesday, August 2, 2011

जेवणात ही कढी अशीच राहू दे.

जेवणात ही कढी अशीच राहू दे
ताटातल्या भातावरी अखंड वाहू दे

गंडविले लोणच्यातील तेल वाढूनि
कळले ना त्यात नसे फोड काहूनि?
फोडीसहीत लोणचं जिभेस लाभू दे

रोज डाळ शोधण्याचा छंद आगळा
पोळी अन पापडाचा ना अर्थ वेगळा
आमटीत मीठ नित्यनेम असू दे

घासात ह्या केस तुझा नित्य भेटतो
तोंडातुन ओढूनि मग त्यास काढतो
जेवणातील हे प्रकार बंद होऊ दे


मुळ गीत इथे पहा.


* * *

Monday, November 29, 2010

डोक्यावरी पहाता प्रतिचंद्र.

डोक्यावरी पहाता प्रतिचंद्र चमकणारे
आले क्षणात पुरते भडकून राग सारे

माझ्याच लोचनांना झालो अनोळखी मी
कळले ना कुंतलांस का प्यारी होई भूमी
फुलतील कसे आता ते, डोक्यावरी पिसारे

मज हवी हवी वाटे संपुर्ण केशशोभा
माझा नि शांपू-तेलांचा आहे जुना घरोबा
केस एक एक गळता, अंगावरी शहारे

नसता मनात माझ्या का डोके हलके वाटे
केसांतूनी फिरणार्‍या कंगव्याची याद येते
झाले कपाळ मोठे, टाळूवरी निखारे..

* * *

मुळ गीत इथे पहा.