हि काल्पनिक घटना त्यावेळची आहे ज्यावेळी कांदे बाजारात 150, झी चोवीस तासवर 200, एबीपी माझावर 300 व टीव्ही9मराठीवर 425 रुपये किलोने मिळत होते.
सोशल मीडियावर महागड्या कांद्यावरील मीम्स वाचून गोपी अफाट हसत होता. लोकांच्या कल्पकतेला मनोमन दाद देत होता. आपल्याला हे असलं कसं सुचत नाही! लोकं कशी हुशार आहेत, आणि आपण कसे अकलेचे कांदे आहोत असा विचार मनात आलेला असतानाच गोपीला समोरून निराक्का घाईघाईने त्याच्या घराकडे येताना दिसली.
निराक्काच्या मुलीला रसिकाला यंदा तेविसावं लागलंय, त्यामुळे तिचे हात पिवळे करण्याची घाई निराक्काला केव्हाचीच लागलेली आहे. ती ज्या वेगात इकडे येत होती, त्या वेगाने तिने रसिकाचा साखरपुडाही उरकला असता. गोपीची धाकधूक थोडी वाढली.
"बांडा, माज्या घरात चोरी झालीय." दम टाकत आक्का बोलली.
गोपीच्या मनातील धास्ती बिनधास्तीमध्ये परावर्तित झालेली होती.
"काय गेलं चोरीला?"
रसिकाच्या लग्नासाठी आक्कानं दागदागिने बनवून ठेवलेले असावेत आणि तेच चोरीला गेले असावेत, अशी शंका त्याला आली.
"कांदे."
"कांदे !!!!!" गोपी उडालाच. त्याच्या मनातली शंकेची पाल फिट येऊन पडली ती पडलीच. तिच्या नाकाला कांदा लावायची वेळ आली होती.
"तेपन एक दोन नाय, चांगले धा किलो. मेल्याचं वाटोळं होईल." आक्कानं ऑन द स्पॉट शाप दिला.
सध्या कांद्याला जो काही भाव आलेला आहे तो पाहता कांदे कशाला कोण चोरील? हा प्रश्न विचारणं मूर्खपणाचं ठरलं असतं.
"टंगात* ठेवले होते टाळं लावून. गुलाम टंगच उचलून घेऊन गेला. मेल्याला हगवण लागंल." आक्काची टंग घसरत होती.
"परवाला पोरीला बघायला पावणे येनार हायेत. माजे कांदे शोदून दे. देवाशपथ सांगतंय, मी तुज्या वजनाइतका चारा माज्या करीनाला* खायला घालीन." असं म्हणून भावूक झालेल्या निराक्कानं डोळ्याला पदर लावला. कांदा आताही तिला रडवत होता.
ही मघाची निराक्का नव्हती, ही 'निरा'ळीच आक्का होती.

गोपीलाही थोडं वाईट वाटलंच. ही भलतीच केस त्याच्याकडं आली होती. आता निराआक्काचे कांदे शोधायचे कसे? त्यांनी सांगितल्याप्रमाणे कांद्याचा आकार गोपीच्या अंगणातल्या पेरूएवढा होता. तपासकामात मदत व्हावी म्हणून ओटीत बांधून आणलेला एक कांदा त्यांनी गोपीला दिला. परंतू एवढ्याशा गोष्टीवरून कांदे शोधणे महाकठीण काम होते. गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कांदे तपासत बसण्याइतका वेळ नव्हता व ते बरंही दिसत नव्हतं.
युट्युबवर हरवलेले कांदे कसे शोधावे? असा सर्च दिला तर युट्युबने कांद्याची लागवड, त्यांची निगा व त्याची साठवणूक कशी करावी याविषयीचे व्हिडीओज दाखवले.
परवाच्या आत कांदे सापडायला हवेत, अन्यथा रसिकाच्या कांदेपोहे कार्यक्रमात विघ्न येतील, परिणामी तिला तिचा 'ओ'* मिळणार नाही. ओ फॉर ओनियन आता ओ फॉर ऑक्सिजनइतका महत्वाचा झाला होता.

अशातच ऑक्सिजन घेणं थांबवल्यामुळे बाबू धुमाळाचे तीर्थरूप गुणा धुमाळ देवाघरी गेले. त्यांची अंत्ययात्रा स्मशानाकडे कूच करत असताना स्मशानाच्या रस्त्यात पडणाऱ्या टेपावर* गोपीला एक ट्रंक दृष्टीस पडली. ट्रंक अर्थातच रिकामी होती. ती ट्रंक आपलीच असल्याचं सांगून निराक्कानं त्यावर शिक्कामोर्तब केलं.
त्या ट्रंकेवर चोरानं कोळशानं लिहलेली 'अल-कांदा' अशी अक्षरं पाहून गोपी बुचकळ्यात पडला.
*
दोन दिवस अजून असेच गेले. गोपीला 'अल-कांदा' टोळीचा कसलाही सुगावा लागेना.
इकडे कांदापोह्यात कांदाच नसल्याचं सांगून रसिकाला पाहायला आलेल्या पाहुण्यांनी रसिकाला नापास केलं ते केलंच. निराक्काच्या घरी सुतकी वातावरण निर्माण झाले.
कांदे चोरण्यासाठी गावात अल-कांदा नावाची टोळी आल्याची खबर कांद्याच्या वासासारखी लपून न राहता गावभर दरवळली.
ज्याने त्याने आपापल्या घरचे कांदे सुरक्षित जागी लपवायला सुरुवात केली.

कुणी गोदरेज कपाटाच्या लॉकरमध्ये लपवले, कुणी माळ्यावर पोत्यात घालून ठेवले, कुणी पेंढयाच्या आत लपवून वर पेंढे रचून ठेवले, तर कुणी कशात-बशात. हरचन पाटलाने तर कमालच केली. त्याने कांदे एका मडक्यात टाकून सोन्याचा हंडा पुरतात तसे परसातल्या जमिनीत पुरले. रोज तो तिथली जागा उकरून एकेक कांदा काढीत असे.
आपल्या घरी कांदे आहेत, हे चोरांना कळू नये म्हणून लोकं कांद्याच्या सालीदेखील घराबाहेर टाकत नव्हते. इतकंच कशाला, फोडणी देतानाही बायका घराची दारं-खिडक्या बंद करू लागल्या. इतकी धास्ती घेतली होती लोकांनी त्या टोळीची.
गुणा धुमाळाचं बारावं घालण्यासाठी गावातील लोकं नदीकाठी स्मशानाजवळ जमली होती. गोपीदेखील तिथं हजर होता.
बाबू व गोपी एकाच वर्गात शिकले होते.
बाराव्याचे विधी आटोपल्यावर बाबू पिंडाला कावळा शिवण्यासाठी पिंडाचं पान चिंचेच्या झाडाखाली ठेऊन आला. सगळी मंडळी गुणा धुमाळाच्या नव्या काकवताराची प्रतीक्षा करू लागली.
काही वेळाने एक कावळा पिंडाभोवती घुटमळू लागला, मात्र त्याला पिंडाच्या गोळ्यात चोच मारण्याची इच्छा दिसेना. बराच वेळ गेला कावळा नुसताच पानाभोवती फेर धरत होता. शेवटी मंडळी कावली.
"च्यायला त्या कावळ्याच्या ! एकदा त्या पिंडात चोच घुसवली तर त्याची चोच काय मोडनार हाय होय." कावलेला एकजण सुमडीत पुटपुटला.
"अरे हा कावळा हाय का मस्करी!" कावलेला दुसरा.
"गुर्जी दर्भाचा कावळा बनवा आता." कावलेला तिसरा.
"मला वाटतं, गुणातात्यांचा जीव कशात तरी अडकलाय."
"काय रे बाबू, काय शेवटची इच्छा-बिच्छा होती काय तुझ्या बाबाची?" सरपंच
"सुनेचं तोंड बगीतलं कि मी मरायला मोकळा असं म्हनाला होता मला मागं." दगडू कांबळे.
"मंडळी, तुमी उगाच पराचा कावळा करताय. इच्छा म्हंजे... तसं काय ऱ्हायली नाय. पन जीव सोडण्याआधी कांदाभजी खायला घाला असं म्हनालेले ते. त्याप्रमाणं आईनं बनवलीपन होती कांदाभजी. पहिलं भजं तोंडात टाकलं आणि त्यांनी जे डोळे मिटले ते मिटलेच." हे सांगताना बाबू गहिवरला.
"अरे मग त्यांची इच्छा अपुरीच ऱ्हायली म्हण की. मग कसा शिवंल पिंडाला कावळा! बाबज्या, बाबूच्या घरी जा आणि आताच्या आता भज्या काढायला सांग." सरपंच
बाबज्यानं स्कुटीला किक मारली आणि तो सुसाट पळाला. तोवर मंडळींना चघळायला विषय मिळाला.
बाबज्या कांदाभजी घेऊन आला. बाबूनं चार - पाच भजे गोळ्याशेजारी ठेवले व तो मंडळींत येऊन वाट पाहू लागला.
... आणि काय आश्चर्य ! कावळ्याने क्षणाचाही विलंब न करता जे भजं तोंडात घातलं ते घातलंच. गुणा धुमाळानं कावळ्याच्या रुपात चोच मारून आपले 'चोच'ले पुरवले. तहानलेल्या कावळ्याच्या कथेतल्या कावळ्यासारखा तो तृप्त होऊन उडालादेखील.

कावलेल्या लोकांनी उरलेली भजी मट'कावली'. गोपी या भजी प्रकाराकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होता. त्याला बाबूकडच्या भज्यांना चोरीचा वास येत होता.
*
*
बाबू व गोपी निराक्काच्या घरी बसले होते. कुणी काही बोलत नव्हतं. नुसताच चहा फुरकतानाचा आवाज येत होता.
कालच गोपी बाबूच्या घरी हाक* मारण्यासाठी गेलेला होता.
गोपी आपल्याला निराक्काच्या घरी का घेऊन आला, याचं उत्तर अजूनही बाबूला सापडत नव्हतं.
"निराक्का तुमच्याकडचे कांदे बाबूच्या घरी सापडले." गोपीनं सुरुवातीलाच बॉम्ब फोडला. बाबूला चहाचा एक सणसणीत ठसका गेला तो गेलाच. बाबूला ठसक्यात उत्तर सापडलं होतं. त्याला पुढे चहा प्यावासा वाटेना.
"पण ते कांदे बाबूने चोरले नाहीत. तुमच्या मुलीने रसिकानेच ती कांद्याची ट्रंक बाबूकडे नेऊन दिली." रसिकाचा चेहरा गोरामोरा व निराक्काचा चेहरा लालतांबडा झाला.
"बाबूने ट्रंकेतले कांदे काढून घेऊन तीवर 'अल-कांदा' असं लिहलं व ती ट्रंक टेपावर फेकून दिली. जेणेकरून कांदे चोरी झाल्याचा भास होईल."
"पण हे सगळं कशावरनं..." बाबू आळ झटकण्याचा प्रयत्न करत होता.
"आपण दोघं एकाच वर्गात शिकलोत बाबू. तुझं अक्षर ओळखायला मला फार कष्ट पडले नाहीत. तुझी 'क' लिहण्याची पद्धत म्हणजे अंडाकृती आकार काढायचा व मधे एक उभी रेघ ओढायची बस्स..! असा आगळा-वेगळा 'क' अजून कुणी गावात काढत नसावा." बाबूने कपातला 'क' मुकाट खाली ठेवला.
निराक्का काही बोलू पाहणार इतक्यात पुन्हा गोपी म्हणाला,
"आता तुम्ही म्हणाल, माझी पोरगी का बरं असं करेल?" निराक्कांना बहुधा हेच विचारायचं असावं. त्यांनी फक्त मान हलवली.
"उत्तर अगदी सोप्पं आहे. प्रेम. बाबू आणि रसिकाचं एकमेकांवर प्रेम आहे. बाबूच्या मनगटावर बदामात 'आर' गोंदलेला तुम्हाला पाहायला मिळेल. आर फॉर रसिका. बाबूचं खरं नाव जरी दीपेश असलं तरी तो 'आर' कशाला गोंदवून घेईल! नाही का?"
निराक्कांना आरपार धक्का बसला. तेवढया वेळात बाबू आणि रसिकाने लाजून घेतलं.
"तुम्ही तपासकार्यासाठी जो कांदा माझ्याकडे दिला होता त्याला सत्तेचाळीस पापुद्रे होते. बाबूकडे जो कांदा सापडला त्यालाही बरोबर सत्तेचाळीस पापुद्रे असणे हा काही योगायोग नाही." निराक्कांकडे जर सत्तेचाळीस बोटे असती तर त्यांनी ती सगळीच तोंडात घातली असती.
"पण बाबूचा नाईलाज होता. वडील शेवटची घटका मोजत होते. त्यांना कांदाभजी खायची लहर आली. म्हणून त्यांच्या भावी सुनेने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही चोरी केली."
आपलंच नाणं खोटं समजून निराक्कांनी बाबूला माफ केलं.
बाबूने एक कांदा स्वतःकडे ठेऊन उरलेले कांदे निराक्कांना परत केले. तो कांदा पूर्ण सोलून पाहिला तेव्हा त्याला त्यात बरोबर सत्तेचाळीस पापुद्रे सापडले. त्याने मनोमन गोपीची प्रशंसा केली.
लवकरच बाबू व रसिका लग्नाच्या बेडीत अडकले. रुखवतात निराक्कांनी चांगले दहा किलो कांदे ठेवले होते. त्यांनाही प्रत्येकी सत्तेचाळीस पापुद्रे असणार म्हणजे असणारच.

मांडवावर एक कावळा कधीपासून काव-काव करत होता.
बाबूचे तीर्थरूप नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असावेत, कि त्यांना पुन्हा कांदाभजी खायची इच्छा झाली होती?

* * *
*टंग = ट्रंक, पत्र्याची पेटी
*करीना = निराक्काच्या म्हशीचं बारशाचं नाव
*ओ = नवऱ्याला बोलावण्यासाठी बायकोने उच्चारालेला बाराखडीतील एकमेव असा स्वर, जो कानी पडताच नवऱ्याच्या शरीरातील पंचमहाभूते जागृत होतात.
*टेप = उकिरडा, गावातील कचरा टाकण्याची जागा. सतत कचरा जमा होऊन तयार झालेला टेपरा (उंचवटा)
*हाक मारण्यासाठी जाणे = सांत्वन करण्यासाठी जाणे.

No comments:
Post a Comment